ETV Bharat / state

जिल्ह्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू; वेगवेगळ्या ठिकाणच्या घटना

जिल्ह्यातील देवरी आणि अर्जुनी मोरगाव या दोन तालुक्यात मंगळवारी वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. यामध्ये एका १४ वर्षीय मुलीचा व ४३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सलोनी दिंगबर बावणे(१४) आणि आसाराम कोंदण मोहुले अशी दोघा मृतांची नावे आहेत.

Two died due to lighting strike
जिल्ह्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू
author img

By

Published : Jul 22, 2020, 7:30 AM IST

गोंदिया - जिल्ह्यातील देवरी आणि अर्जुनी मोरगाव या दोन तालुक्यात मंगळवारी वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. यामध्ये एका १४ वर्षीय मुलीचा व ४३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सलोनी दिंगबर बावणे(१४) आणि आसाराम कोंदण मोहुले अशी दोघा मृतांची नावे आहेत.

पहिल्या घटनेत देवरी तालुक्यातील मुरदोली येथील सलोनी ही आपल्या आई-वडिलांसह घरच्या शेतामध्ये भाताची रोवणी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक पाऊस व विजेचा कडकडाट सुरू झाला, यादरम्यान सलोनीच्या अंगावर वीज पडली. त्यानंतर तिला तत्काळ देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

तर दुसरी घटना ही जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव येथील परसोडी येथे घडली. शेतकरी आसाराम कोंदण मोहुले हे आपल्या शेतात रोवणीची काम करत असताना सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास पवासाला सुरुवात झाली आणि त्याचवेळी आसाराम मोहुले यांच्या अंगावर वीज कोसळली, त्यांनाही अर्जुनी-मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात दाखल करण्यात आले त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोन्हींची नोद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.