गोंदिया - रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोपचे चाळ बालाघाट रोडवरील युनियन बँकेचे ( Union Bank ATM Theft ) एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ( Two Arrest In ATM Theft Case ) अटक केली. त्या आरोपींजवळून ७० हजारांचा मालही जप्त करण्यात आला आहे. जय उर्फ बॉबी पाटील ( रा. कुडवा ) व त्याचा मित्र राहुल उर्फ चंगा लिल्हारे, असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
दोघांना अटक -
बोपचे चाळ बालाघाट रोडवरील युनियन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला होता. या घटेनचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी संशयितरित्या फिरताना आढळून आले. दोघांनीच एटीएम फोडल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी कुडवा येथील जय उर्फ बॉबी राजेश पाटील आणि राहुल उर्फ चंगा लिल्हारे यांना अटक केली. चौकशीदरम्यान, राहूलने गुन्ह्याची कबूली दिली.
तीन गुन्हे उघडकीस -
दरम्यान, दोघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी चोरी आणि घरफोडी केल्याचीही माहिती पुढे आली. ३ आठवड्यांपुर्वी बापट लॉन गोंदिया जवळील एका घरात घरफोडी तर गौरीनगर गणेशनगर गोंदिया येथे एका घरात घरफोडी केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ५ वर्ष आधी आरोपी जय उर्फ बॉबी पाटील रा. कुडवा याने या आधी एक एटीएम फोडून चोरी केल्याची कबुली दिली.
हेही वाचा - Schools Closed in Pune : पुण्यात कोरोनाचा विस्फोट; पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद - अजित पवार