गोंदिया - सालेकसा तालुक्यातील जांभळी परिसरात रानडुकराची शिकार करणाऱ्या ५ जणांपैकी दोघांना वन विभागाच्या पथकाने अटक केली. तसेच त्यांच्याकडून ३ किलो मांस जप्त करण्यात आले. प्रकाश सुरजलाल कुसराम (४२) व हिरालाल गोमाजी कुंजाम (४0,रा.जांभळी) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे असून इतर ३ आरोपी फरार आहेत.
जिल्ह्यातील सालेकसा तालुक्याच्या जांभळी परिसरात रानडुकराची शिकार करणार्या आरोपींच्या घरी वन विभागाच्या पथकाने धाड घालून अटक केली. या कारवाईत आरोपींच्या घरातून रानडुकराचे ३ किलोचे मांस जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपी मुकेश चुन्नीलाल ढेकवार, राधेश्याम तन्नुलाल ढेकवार व भैय्यालाल सूद ढेकरवार (रा.जांभळी) हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. तर, पकडण्यात आलेल्या आरोपीं जवळून मांसासह शिकारीसाठी वापरण्यात येत असलेले सेंट्रींग तार, कुर्हाडी व खुंट्या जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपींना अमगावच्या न्यायालयात हजर करण्यात आले असून या दोन्ही आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास वन परिक्षेत्राधिकारी अभिजित इलमकर व यांची चमू करीत आहे.
हेही वाचा - धरणाच्या कालव्यात बसून शेतकऱ्यांचे उपोषण
हेही वाचा - गोंदियात ट्रेनच्या धडकेत दोन हरणांचा मृत्यू