ETV Bharat / state

बिबट्याच्या हल्ल्यात दोन बकरे आणि एक शेळी ठार; नवेगावबांध येथे बिबट्याची दहशत

author img

By

Published : Aug 7, 2020, 2:53 PM IST

ग्रामस्थांना रात्री बकऱ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने गोट्यात गेले असता हा प्रकार लक्षात आला. एक शेळी बिबट्या घेऊन गेला असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या तक्रारीवरून वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला. मागील उन्हाळ्यातसुद्धा येथील महावितरणच्या कार्यालयाच्या बाजूला अनेकांनी बिबट्या बघितला. यापूर्वीही देखील या परिसरातील गाई-बैलांना बिबट्याने ठार मारले आहे. त्यावेळी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.

three goats died in leopard attack
बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या शेळ्या

गोंदिया - अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील प्रभाग क्रमांक 4मध्ये एका गोठ्यातील दोन बकरे व एका शेळीचा बिबट्याने फडशा पाडला. काल रात्री बिबट्याने 11.45च्या सुमारास गोठ्यात दोन बकरे जागेवर ठार मारले तर एक शेळी सोबत घेऊन गेला,असल्याचे समोर आले आहे.

ग्रामस्थांना रात्री बकऱ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने गोट्यात गेले असता हा प्रकार लक्षात आला. एक शेळी बिबट्या घेऊन गेला असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या तक्रारीवरून वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला. मागील उन्हाळ्यातसुद्धा येथील महावितरणच्या कार्यालयाच्या बाजूला अनेकांनी बिबट्या बघितला. यापूर्वीही देखील या परिसरातील गाई-बैलांना बिबट्याने ठार मारले आहे. त्यावेळी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.

वन विभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. कालच्या घटनेमुळे पुन्हा एकदा गावातील पाळीव प्राणी पाळणाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावात बिबट्याची दहशत पसरली आहे. या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.