गोंदिया - देवरी तालुक्यंतर्गत येत असलेल्या मौजा शिरपूर व मकरधोकडा येथील बाघनदी येथे वाळू माफियांना साठवणूक केल्याची माहिती देवरी तहसिलदार यांच्या भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे या पथकाने प्रत्यक्ष जाऊन बघितले असता येथे उपसा करून ठेवलेली वाळू दिसून आली. यावेळी ११० ब्रास वाळू जप्त करण्यात आली.
दंडात्मक कारवाई करण्याची माहिती -
ज्या ट्रॅक्टर मालकांनी ही या वाळूची साठवणूक करून ठेवली होती. त्या ट्रॅक्टर मालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार यांनी दिली आहे. तसेच जिल्ह्याअधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्फत त्यांच्या वाहनाचे परवाने रद्द करण्याची मागणीदेखील करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - ईडीकडून विवा ग्रुपची नऊ तास चौकशी, मेहुल ठाकूरसह मदन गोपाल यांना अटक