ETV Bharat / state

शिक्षणाधिकाऱ्यांच्या बेजबाबदार उत्तराने गोंदियातील शिक्षकांचे आंदोलन चिघळले; शिक्षण विभागात तोडफोड

वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाचा 12  वा दिवस आहे. मात्र, अद्याप त्यांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष दिले नाही. त्यातच आम्हाला शाळेत शिक्षक नाहीत कसे करायचे? हे विचारायला आलेल्या विद्यार्थ्यांनाच शिक्षणाधिकारी यांनी विनाअनुदानित शाळेत प्रवेश घेऊ नये असे म्हटले.

शिक्षकांचे आंदोलन चिघळले
author img

By

Published : Aug 20, 2019, 6:49 PM IST

Updated : Aug 20, 2019, 9:26 PM IST

गोंदिया - गेल्या काही दिवसांपासून वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाचा आजचा 12 वा दिवस आहे. मात्र, अद्याप त्यांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष दिले नाही. त्यातच आम्हाला शाळेत शिक्षक नाहीत कसे करायचे? हे विचारायला आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी विनाअनुदानित शाळेत प्रवेश घेऊ नये, असे म्हटले. त्यामुळे या वक्तव्यावर आक्षेप घेत शिक्षणाधिकारी यांनी माफी मागावी यासाठी आंदोलक शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यालय गाठले.

शिक्षकांचे आंदोलन चिघळले

शिक्षणाधिकारी यांच्यासोबत आंदोलकांचा वाद झाला. यावेळी येथील कार्यालयातील खुर्च्या, टेबलावरील काचेची आंदोलक शिक्षकांनी तोडफोड केली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले. याची तक्रार शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी ग्रामीण पोलीस ठाणे येथे केली. ग्रामीण पोलिसांनी सर्व आंदोलक महिला, पुरुष शिक्षकांना ताब्यात घेतले आहे.

आंदोलक शिक्षकांनी उग्ररुप धारण केल्याने जिल्हा परिषद वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. सोमवारी या शिक्षकांनी अर्धनग्नावस्थेत जिल्हा परिषदेसमोर रस्त्यावर उतरुन आंदोलन केल्याने सर्वांचे लक्ष वेधले होते.

Intro:
Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :-20-08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- mh_gon_20.aug.19_teacher andolan_7204243

शिक्षकांचे आंदोलन चिघळले
आंदोलक शिक्षकांनी शिक्षण विभागात केली तोडफोड
शिक्षकांना अटक
Anchor:- गोंदिया येथे मागील ऑगस्ट पासून आपल्या वेतनाच्या मागणीला घेऊन आंदोलन करणार्या महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाचा १2 वा दिवस असूनही अद्याप त्यांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष दिले नाही. त्यातच आम्हाला शाळेत शिक्षक नाहीत कसे करायचे हे विचारायला आलेल्या विद्यार्थ्यांनाच शिक्षणाधिकारी यांनी विनाअनुदानित शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊ नये असे म्हटल्याने. त्या वक्तव्यावर आक्षेप घेत शिक्षणाधिकारी यांनी माफी मागावी यासाठी आंदोलक शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यलय गाठले. शिक्षणाधिकारी यांच्यासोबत झालेल्या वादात त्या कार्यालयातील खुर्च्या टेबलां वरची काचे तोडफोड आंदोलक शिक्षकांनी केल्याने चांगलेच वातावरण तापले. याची तक्रार शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे केली असता ग्रामीण पोलिसांनी सर्व आंदोलक महिला पुरुष शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
VO :- आंदोलक शिक्षकांनी उग्ररुप धारण केल्याने जिल्हा परिषद वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. शिक्षण विभागातील साहित्याची तोडफोड केल्याचे वृत्त कळताच गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक जिल्हा परिषदेत दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी त्या सर्व आंदोलक शिक्षकांना ताब्यात घेत वाहनातून ग्रामीण पोलीस ठाण्यात नेले. परिणामी सोमवारी ला या शिक्षकांनी अर्धनग्नावस्थेत जिल्हा परिषदे समोरील रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याने सर्वांचे लक्ष वेधले होते.
BYTE :- मनोहर दाभाडे (पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस स्टेशन गोंदिया)
BYTE :- प्रफुल कचवे (शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद)Body:VO :- Conclusion:
Last Updated : Aug 20, 2019, 9:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.