ETV Bharat / state

Gondia Students Fainted : एकाच टेम्पोत 120 विद्यार्थी कोंबले; अनेकजण बेशुद्ध

गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी शाळा मजितपूर ( Government Tribal School Majitpur ) काही काही मुले, मुली टेंपोमध्येच बेशुद्ध ( Students fainted at Majitpur Ashram School ) झाले.

Students Fainted
विद्यार्थी झाले बेशुद्ध
author img

By

Published : Sep 25, 2022, 8:31 AM IST

Updated : Sep 25, 2022, 8:47 AM IST

गोंदिया - गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी शाळा मजितपूर ( Government Tribal School Majitpur ) येथील १२० आदिवासी मुलं मुली खेळण्यासाठी एकाच टेंपो मध्ये कोंबून नेण्यात आले. त्यामुळे काही मुले, मुली टेंपोमध्येच बेशुद्ध (Students fainted at Majitpur Ashram School ) झाले. त्यांना एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. तर, एका मुलीला गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

विद्यार्थी बेशुद्ध

कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी जात असताना घडला प्रकार - या विद्यार्थ्यांना कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला आहे. अखेर गाडीत मोठा गोंधळ उडाल्यानंतर गाडी थेट एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला वळवण्यात आली. कोयलारी आश्रम शाळेवरून परतताना हा प्रकार घडला आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर एका मुलीला उपचारासाठी गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

विद्यार्थी बेशुद्ध - शासकीय आदिवासी शाळा मजितपूर येथील विद्यार्थी आहेत. या सर्वांना कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी घेऊन जाण्यात आले. तिथून परत येतांना हा प्रकार घडला. परत असताना काही विद्यार्थी बेशुद्ध पडले गाडीत गोंधळ उडाला. अखेर गाडी थांबवण्यात आली. तिथे असलेल्यांना समजत नव्हतं. त्यामुळे तातडीन सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत.

Last Updated : Sep 25, 2022, 8:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.