ETV Bharat / state

स्टील कंपनी दुर्घटना; दोन मजुरांचा नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू - गोंदियाच्या बातम्या

स्टील कंपनीमध्ये वितळवलेल्या लोखंडाचे द्रव अंगावर पडल्याने ७ कामगार होरपळले. ही घटना ३१ ऑक्टोबरला दुपारी घडली होती. जखमींपैकी बिरबल चौबे व परवेज या दोघांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

स्टील कंपनी दुर्घटना
author img

By

Published : Nov 7, 2019, 11:51 PM IST

गोंदिया - देवरी एमआयडीसीतील स्टील कंपनीमध्ये वितळवलेल्या लोखंडाचे द्रव अंगावर पडल्याने ७ कामगार होरपळले. ही घटना ३१ ऑक्टोबरला दुपारी घडली होती. जखमींपैकी बिरबल चौबे व परवेज या दोघांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर अजित सोनटक्के, सुनीलकुमार राम, एम. यादव, मोहम्मद अन्सारी कुर्बान अंसारी (रा. रोहतास ससरम, बिहार) असे भाजलेल्या अन्य कामगारांची नावे आहेत.

कमलेश बच्छाव, पोलीस निरीक्षक, देवरी

हेही वाचा - गोंदियात गटविकास अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना एसीबीने केली अटक

दोन महिन्यांपूर्वीच प्राझीया दुलिओ लाईफस्टाईल प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या स्टील फॅक्टरीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. ३१ ऑक्टोबरला दुपारी दीड वाजता फॅक्टरीमध्ये लोखंड वितळवण्याचे काम चालू असताना 'लँडर महयोगॅस' तयार झाल्याने, मेटलला ऊकळी येऊन कामगारांच्या अंगावर लोखंडाचे द्रव पडले. यात ७ कामगार भाजले. सर्व जखमींना देवरी येथील ग्रामीण रुग्णालयातून भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पुन्हा त्यांना तेथून नागपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान बिरबल चौबे व परवेज या दोघांचा मृत्यू झाला. उर्वरित अन्य पाच जखमींवर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.

या घटनेसंदर्भात कंपनीचे मालक, व्यावसायिक व कंत्राटदार यांच्यावर देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. अजून काहीजणांना अटक करण्यात येणार असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 07-10-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia 
File Name :- mh_gon_07.nov.19_01_2 death_7204243
स्टील कंपनीला आग लागून 7 मंजूर भाजले असुन त्यातील 2 मंजुरांचा नागपुर येथे उपचारा दरम्यान मृत्यु
Anchor:- देवरी येथील एम आय डी सी तील स्टील फॅक्टरीमध्ये वितळविलेल्या लोखंडाचे द्रव्य अंगावर पडल्याने ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ७ कामागर भाजले. यात बिरबल चौबे व परवेज या दोघांचा नागपुर येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला. तर अजित सोनटक्के, सुनीलकुमार राम, एम. यादव, मोहम्मद अन्सारी कुर्बान अंसारी रा. रोहतास ससरम, बिहार असे भाजलेल्या अन्य कामगारांचे नाव आहे. दोन महिन्यांपुर्वीच देवरी येथील एम आय डी सी मध्ये प्राझीया दुलीओ लाईफस्टाईल प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या स्टील फक्टरीचे पालकमंत्रीच्या  हस्ते उद्घाटन करण्यात आले होते ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १:३० वाजता फॅक्टरीमध्ये लोखंड वितळविण्याचे काम करीत असताना लॅडर महयोगॅस तयार झाल्याने मेटलला उकळी येउन कामगारांच्या अंगावर लोखंडाचे द्रव्य पडले यात सात कामगार भाजले. सर्व जखमींना देवरी येथील ग्रामीण रूग्णालयातुन भंडारा येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल मात्र पुन्हा त्यांना तिथुन नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान बिरबल चौबे व परवेज या दोघांचा मृत्यु झाला असुन उर्वरित अन्य पाच जखमींवर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. या घटने संदर्भात कंपनीचे मालक, व्यवसायक व कंत्राटदार यांच्या वर देवरी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०४, ३३८, २८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन एकाला अटक हि करण्यात आली आहे. बाकी आरोपी ला अटक करण्यात येणार असून तपास सुरू आहे.
BYTE :- कमलेश बच्छाव (पुलिस निरीक्षक देवरी)Body:VO :-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.