ETV Bharat / state

विकासच नाही; गोंदियातील सीतेपार ग्रामस्थांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार - Maharashtra Assembly Election Update

आमगाव तालुक्यातील सीतेपार या गावची लोकसंख्या २०११ च्या जणगणनेनुसार २५०० चे आसपास आहे, तर  आधीच या ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाला याबाबत निवेदन देत येत्या २१ ऑकटोबरला होणाऱ्या निवडणुकीत मतदान करणार नसल्याबाबत निवेदन दिले होते.

सीतेपार ग्रामस्थांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार
author img

By

Published : Oct 21, 2019, 4:44 PM IST

गोंदिया - मागील पाच वर्षात स्थानिक आमदारांनी गावाचा विकास केला नसल्याने जिल्ह्यातील देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्रातील सीतेपार या गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकत शासनाचे लक्ष वेधले आहे. दोन दिवसांपूर्वीच ईटीव्ही भारतने ही बातमी प्रकाशीत केली होती. या बातमीची प्रशासनाने आणि मतदारसंघातील आमदारांनीही दखल घेत ग्रामस्थांची घेतली होती. परंतु ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम असून त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातलेला आहे.

सीतेपार ग्रामस्थांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार

आमगाव तालुक्यातील सीतेपार या गावची लोकसंख्या २०११ च्या जणगणनेनुसार २५०० चे आसपास आहे, तर आधीच या ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाला याबाबत निवेदन देत येत्या २१ ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीत मतदान करणार नसल्याबाबत निवेदन दिले होते. तर स्थानिक प्रशासनाने देखील याच पाठपुरावा करीत समस्या मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र, केवळ आश्वासनावर अवलंबून न राहता काही तरी ठोस पाऊले प्रशासनाने उचलावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती.

हेही वाचा - बीडमध्ये बोगस मतदारांवरुन राडा, मतदारांना अडवून दमदाटी

अखेर गावातील ८० टक्के ग्रामस्थांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकीत मतदान केले नाही. तर काही ग्रामस्थांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. सीतेपार गावाचा विचार केला असता या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र नाही, पिण्याचा पाण्याची सोय नाही, तसेच गावातील अंतर्गत रोड, रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

हेही वाचा - विधानसभा निवडणूक Live : राज्यात आतापर्यंत 34.37 टक्के मतदान, गडचिरोलीत मतदान केंद्रावरील शिक्षकाचा मृत्यू

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 21-10-2019
Feed By :- Reporter App
 District :- gondia
 File Name :- mh_gon_21.oct.19_bahishakar_7204243
टीप :- या आधी WKT मोजो वरून पाठवली आहे 
सीतेपार ग्रामवासीयांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार 
Anchor :- मागील पाच वर्षात स्थानिक आमदारांनी गावाचा विकास न घडवून आणल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्रातील सीतेपार या गावातील ग्रामवासियांनी मतदानावर बहिष्कार टाकत शासनाचे लक्ष वेधले आहे, दोन दिवसा अगोदर etv भारत ने हि बातमी प्रकाशीत केली असता या ठिकाणी प्रशासनाने ग्राम वासियांकडे आपले प्रतिनिधी पाठविले होते तसेच या क्षेत्रातील असलेले आमदार हि  या ग्राम वासियांनी आपले निर्णय ठाम ठेवत आज निवडणुकीवर बहिष्कार घातलेला आहे. 
VO :- आमगाव तालुक्यातील सीतेपार या गावाची लोकसंख्या २०११ चा जणगणनेनुसार २५०० चे आसपास आहे, तर  आधीच या ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाला या बाबत निवेदन देत येत्या २१ ऑकटोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करणार नाही या बाबत सूचना व निवेदन देण्यात आले होते तर स्थानिक प्रशासनाने देखील याच पाठपुरावा करीत समस्या मार्गी लागणार असे आश्वासन देण्यात आले होते मात्र केवळ आश्वासनावर अवलंबून न राहता काही तरी ठोस पाऊले प्रशासनाने उचलावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होते मात्र तोडगा निघू शकला नाही अखेर आज या गावातील ८० टक्के ग्रामस्थांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकीत मतदान केलेच नाही तर काही ग्रामस्थांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला, आज सीतेपार या गावाचा विचार केला असतात या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र नाही, पिण्याचा पाण्याची सोया नाही तसेच गावातील अंतर्गत रोड, रस्त्याची दुराव्यास्था झालेली आहे त्यामुळे पुरुषासोबत महिलांनी देखील एकांतरित येत मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
BYTE :- घनश्याम रहांगडले ( ग्रामस्थ )
BYTE :- पुरुषोत्तम चौधरी ( ग्रामस्थ )
BYTE :- लता डोरलीकर (ग्रामस्थ )
BYTE :- राजकुमार रामटेके ( केंद्र अद्यक्ष, सीतेपार)Body:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.