ETV Bharat / state

झाडाखालची शाळा : नव्या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यात यश - Gondia Schools news

या टीममधील सर्वजण आपापल्या घराजवळील गावांमध्ये किंवा आपापल्या गावांमध्ये झाडाखाली वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. यासाठी त्यांनी त्यांच्या गावातील सरपंचांकडून परवानगी मिळवली आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू झाले. हे सर्वजण आज जिल्ह्यात १०४९ शाळांमधील १ लाख ७० हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात जाऊन झाडाखाली वर्ग भरवून शिक्षण देत आहेत.

गोंदिया : झाडाखालची शाळा
गोंदिया : झाडाखालची शाळा
author img

By

Published : Oct 16, 2020, 7:48 PM IST

गोंदिया - कोरोनामुळे संपूर्ण देशासह राज्यातीलही सर्वच शाळा-महाविद्यालये बंद झाली. मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. या ऑनलाईन शिक्षणप्रणालीला प्रतिसादही मिळू लागला. मात्र, पायाभूत सुविधांची आणि तंत्रज्ञानाची वानवा असणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा अभ्यास शाळा बंद झाल्याने रखडला.

गोंदिया : झाडाखालची शाळा
गोंदिया : झाडाखालची शाळा

ग्रामीण भागातील अनेक मुलांच्या पालकांकडे मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी अ‌ॅन्ड्रॉईड मोबाईल किंवा लॅपटाॅप्स नाहीत. ज्यांच्याकडे अ‌ॅन्ड्रॉईड मोबाईल आहेत, त्यांच्याकडेही कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. असे विद्यार्थी शाळेपासून दुरावले तर, त्यांना पुन्हा शिक्षणाकडे आणणे अतिशय अवघड होईल. यासाठी गोंदिया येथील एन. एम. डी. कॉलेजमधले प्रा. बबन मेश्राम यांनी ग्रामीण भागातील मुलांचा शिक्षणाचे नुकसान होऊ नये, यासाठी विशेष शक्कल लढवली. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) आजी-माजी तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून त्यांची टीम तयार केली.

गोंदिया : झाडाखालची शाळा

हेही वाचा - ईटीव्ही भारत ग्राउंड रिपोर्ट: नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; झाडावरच कापसाला फुटले मोड

या टीममधील सर्वजण आपापल्या घराजवळील गावांमध्ये किंवा आपापल्या गावांमध्ये झाडाखाली वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. यासाठी त्यांनी त्यांच्या गावातील सरपंचांकडून परवानगी मिळवली आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू झाले. हे सर्वजण आज जिल्ह्यात १०४९ शाळांमधील १ लाख ७० हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात जाऊन झाडाखाली वर्ग भरवून शिक्षण देत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची साखळी तुटू नये, यासाठी प्रा. मेश्राम यांनी हा उपक्रम राबवला. या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच योगाचेही धडे दिले जात आहेत. यामुळे दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या संकटातही शिक्षणाच्या प्रवाहात राहणे शक्य होणार आहे.

हेही वाचा - पालिकेच्या महिला अधिकाऱ्याकडून असभ्य वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाच्या कानशिलात!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.