ETV Bharat / state

लॉकडाऊनला फ़ाटा देत सौन्दड येथे भरला आठवडी बाजार...प्रशासनाचे दुर्लक्ष. - saundad market

सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौन्दड येथील आठवडी बाजार गेल्या दोन आठवड्यापासून भरवला जात आहे. लॉकडाऊनला फाटा देत असल्याच्या प्रकार उघड झाला आहे.

market
लॉकडाऊनला फ़ाटा देत सौन्दड येथे भरला आठवडी बाजार...प्रशासनाचे दुर्लक्ष.
author img

By

Published : Apr 2, 2020, 2:58 PM IST

गोंदिया- सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौन्दड येथील आठवडी बाजार गेल्या दोन आठवड्यापासून भरवला जात आहे. लॉकडाऊनला फाटा देत असल्याच्या प्रकार उघड झाला आहे. शिवाय 'सोशल डिस्टन्स'चाही बोजवारा उडाला असल्याचे चित्र आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रकोप बघता गर्दी टाळण्यासाठी गोंदिया जिल्हाधिकारी यांनी 23 मार्चला आठवडी बाजार भरवण्यास बंदी घातली होती. त्याला फाटा देत सौन्दड येथे भरलेला आठवडी बाजार कोरोनाचा फैलाव करण्यास कारणीभूत ठरू शकतो.

लॉकडाऊनला फ़ाटा देत सौन्दड येथे भरला आठवडी बाजार...प्रशासनाचे दुर्लक्ष.

तसेच गोंदिया येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णही आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. या आठवडी बाजाराची पोलिसांना माहिती मिळताच बाजार उठविण्यास सुरुवात केलीे. याबत आम्हाला कोणतीही अशी सूचना नसल्याचे भाजीदुकानदारांचे म्हणणे आहे. मात्र, जिल्हाधिकारी यांच्या आठवडी बाजार बंद करण्याचा स्पष्ट आदेश ग्रामपंचायतीत असताना सौन्दड गावात भरलेला आठवडी बाजारावर बंदीबाबत जनजागृती न करणाऱ्या ग्रामपंचायतीवर काय कारवाई होते, हे बघणे विशेष ठरेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.