गोंदिया - देशभरात 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनीही केले आहे. तरीही काही लोक गरज नसताना घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे चिचगाव (ता. गोरेगाव) येथील ग्रामस्थांनी बाहेरील लोकांना प्रवेश नाकारत गावात येणाऱ्या रस्त्यावर काटे टाकत रस्ता बंद केला आहे. तसेच गावातील काही युवक कोणी गावात येऊ नये, यासाठी त्या ठिकाणी गस्त घालत आहेत. तसेच गावामध्ये ध्वनिक्षेपणाद्वारे गावबंद असल्याची माहिती गावकऱ्यांना देण्यात येत आहे.
हेही वाचा - #COVID 19 : बाहेरुन स्वगावी आलेल्यांना देता येणार घर बसल्या वेबसाईटद्वारे माहिती