ETV Bharat / state

गोंदियात रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालाला अटक, ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त - railways e tickits

रेल्वे सुरक्षा दलाच्या चमुला ई- तिकीटांच्या काळ्याबाजाराची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा बलाचे प्रभारी निरीक्षक नंदबहादूर, उपनिरीक्षक विनेक मेश्राम आणि त्यांच्या चमूने धाड टाकली

गोंदियात रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालाला अटक, ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त
author img

By

Published : May 16, 2019, 5:00 PM IST

गोंदिया - जिल्ह्यात सडक अर्जुनी येथे रेल्वेच्या ई-तिकीटांचा अवैध व्यवसाय करणाऱ्या दलालास रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने अटक केली. त्याच्याकडून तब्बल ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दीपक उर्फ पंकज अवेंद्रसिंग (२८) असे या दलालाचे नाव आहे.

रेल्वे सुरक्षा दलाच्या चमुला ई- तिकीटांच्या काळ्याबाजाराची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा बलाचे प्रभारी निरीक्षक नंदबहादूर, उपनिरीक्षक विनेक मेश्राम आणि त्यांच्या चमूने धाड टाकली. सडक-अर्जुनीच्या पवन ऑनलाईन सर्विस, रेल्वे रिझर्वेशन सेंटरवर दीपकची याबाबत चौकशी केल्यानंतर त्याच्या बोगस पर्सनल आयडीने रेल्वेची अवैध पद्धतीने तिकीट बनवित असल्याचे स्पष्ट झाले.

गोंदियात रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालाला अटक

त्याच्या दुकानात असलेल्या लॅपटॉपची तपासणीही करण्यात आली. यामध्ये १५ ई-तिकीट आढळल्या. दीपक आरआरसीटीसीचा अधिकृत ऐजंट नसतांनाही अधिक पैसा कमविण्याच्या नादात आरआरसीटीसीच्या बोगस नावाने आयडी बनवून ग्राहकांची तिकीट बनवत असतो. त्याच्यावर अवैध व्यवसाय आणि रेल्वे अधिनियम कलम १४३ अंतर्गत कारवाई करण्यात आली. दस्तावेजाची तपासणी केल्यावर १५ ई तात्काळ तिकीटाची किंमत २२ हजार ४१४ रूपये, २० हजार रूपये किमतीचा लॅपटॉप, १० हजार रूपये किमतीचा एक प्रिंटर दीड हजार रूपये किंमतीचा राऊटर, ५ हजार रूपये किमतीचा मोबाईल आणि ८७० रूपये रोख, असा ५८ हजार ९१४ रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 16-05-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GONDIA_16.MAY.19_RAILWAY TICKET BROKERS ARREST
रेल्वेची तिकीट विकणाऱ्या दलाला अटक
Anchor :- जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने रेल्वेच्या ई तिकीट कार्यालयावर धाड घालून एका दलाला गुप्त माहितीच्या आधारे अटक करुन 58 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. सडक-अर्जुनीच्या पवन ऑनलाईन सर्विस, रेल्वे रिजर्वेशन सेंटरवर रेल्वे सुरक्षा बलाचे प्रभारी निरीक्षक नंदबहादूर, उपनिरीक्षक विनेक मेश्राम व त्यांच्या चमूने धाड टाकली. दुकान मालक दीपक उर्फ पंकज अवेंद्रसिंह (२८) आपल्या दुकानात हजर होते. रेल्वे आरक्षण तिकीटाच्या संदर्भात त्याला विचारणा केल्यावर व चौकशी केल्यावर त्याच्या बोगस पर्सनल आयडीने रेल्वेची अवैध पध्दतीने तिकीट बनवित असल्याचे स्पष्ट झाले. दुकानात असलेल्या लॅपटॉपची माहिती घेतली. दीपक उर्फ पंकजने बोगस तिकिटे बनवित असल्याची कबुली दिली. सदर दुकानात असलेल्या लॅपटॉपची पाहणी केली असता १५ ई तिकीट तिथे आढळल्या. यासंदर्भात दीपक उर्फ पंकजच्या मते दुकानात पॅनकार्ड, पासपोर्ट बनविण्यासाठी ग्राहक येतात. तो एटीएम सर्विसचा अधिकृत एजेंट आहे. जे ग्राहक येतात त्यातील काही ग्राहकांना रेल्वेची तत्काल तिकीट बनवून देण्याची मागणी करतात. तो आरआरसीटीसीचा अधिकृत एजेंट नसतांनाही अधिक पैसा कमविण्याच्या नादात आरआरसीटीसीच्या बोगस नावाने आयडी बनवून ग्राहकांची तिकीट बनवित असतो. त्याच्यावर अवैध व्यवसाय व रेल्वे अधिनियम कलम १४३ अंतर्गत कारवाई करण्यात आली. दस्तावेजाची तपासणी केल्यावर १५ ई तत्काल तिकीटाची किंमत २२ हजार ४१४ रूपये, २० हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप, १० हजार रूपये किंमतीचा एक प्रिंटर दीड हजार रूपये किंमतीचा राऊटर, ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल व ८७० रूपये रोख असा ५८ हजार ९१४ रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. Body:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.