गोंदिया- तीन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने बी.जी.डब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केली नसल्याची बाब पुढे आली होती. याची दखल घेत जिल्ह्याधिकाऱ्यांनी इमारतीचे स्ट्रॅक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यात ही इमारत जीर्ण असल्याची बाब पुढे आली होती. मात्र या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग या इमारतीची तात्पुर्ती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना वेळीच उपचार मिळावा, यासाठी शासनाने बाई गंगाबाई महिला रुग्णालय सुरु केले होते. या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम १९३९ मध्ये करण्यात आले होते. एकूण २०० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात सध्य १८५ खाटाच उपलब्ध आहेत. त्यामुळे बरेचदा येथे रुग्णांची गैरसोय होते. रुग्णालयाच्या इमारतीला ८० वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने ती जीर्ण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात काही ठिकाणी गळती लागते. या रुग्णालयात महिला आणि लहान बालकांचा देखील उपचार होतो. त्यामुळे जीर्ण झालेल्या इमारतीमुळे रुग्णांच्या जीवाला कुठलाही धोका होवू नये, यासाठी या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी बी.जी.डब्ल्यू रुग्णालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला २०१५ पासून वांरवार पत्र दिले. पण तीन वर्षांचा कालावधी लोटूनही बांधकाम विभागाने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले नाही. मात्र, माध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची दखल घेतली व जिल्हाधिकाऱ्यांकडून आठ दिवसात इमारतीचा अहवाल मागीतला होता.
त्यानंतर इमारतीचे स्ट्रक्टचरल ऑडिट करण्यात आले होते. याला वर्षभराचा कालावधी लोटला असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देऊन इमारतीची पाहणी केली. तसेच या इमारतीची उंची ३ फुटाने वाढविने गरजेचे असल्याचे ठरले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या इमारतीची उंची फक्त १ फुटाने वाढवीत असल्याचे समोर आले असून फक्त तातपूर्ती मलमपट्टी होत असल्याचे दिसत आहे. या करीत रुग्णालयातील महिला वार्ड खाली करण्यात आला असून बांधकामाला सुरूवात झाली आहे. या प्रकारमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग रुग्णांच्या सुरक्षेविषयी गंभीर नसल्याचे दिसत आहे.