गोंदिया - मोरगाव-अर्जुनी तालुक्यातील नवेगावबांध येथील दुकानदारावर जास्त दराने मिठाची विक्री केल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. रोहित येरणे असे किराणा दुकानदाराचे नाव आहे. दुकानदाराने बाजार मूल्यापेक्षा 5 रुपये जास्त आकारून मिठाची विकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
जीवनावश्यक असलेल्या मिठाचा तुडवडा झाल्याची अफवा गोंदिया जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून सुरू होती. लोकांनी मिठ खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे मिठाच्या किमती वाढू लागल्या. याप्रकरणी लक्ष घालत जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जास्त दराने मीठ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देत पुरवठा निरीक्षकाला तपासणीच्या सूचना दिल्या. त्यात नवेगावबांध येथील किराणा दुकानदार रोहित येरणे हे मिठ बाजारमूल्यापेक्षा 5 रुपये जास्त दराने विकत असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.
![gondia](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-gon-18may20-saltsellers-7204243_18052020150316_1805f_1589794396_303.jpg)
जिल्ह्यात मिठाचा पुरवठा मुबलक प्रमाणात असून, इतर दुकानातील मिठाचा स्टॅाकची पाहणी करून, जास्त दरात विक्री केल्यास जीवनावश्यक कायदा अधिनिय 1955 अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.