गोंदिया - मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार विनोद अग्रवाल यांची मनधरणी करण्यासाठी परिणय फुके हे गोंदिया येथे आले होते. मात्र, फुके हे विनोद अग्रवाल यांना समजावण्यात असमर्थ ठरले आहेत. विनोद अग्रवाल यांच्या समर्थकांनी फुकेंना विरोध दर्शवून उमेदवारी मागे घेणार नाही, असे विनोद अग्रवाल यांनी जाहीर केले आहे.
हेही वाचा - थरारक! गुजरातमध्ये कोसळला साठ फूट लांब पूल, पहा व्हिडिओ..
गोंदिया विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार गोपाल अग्रवाल यांना गोंदिया विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. 2014 च्या विधानसभेला भाजपकडून विनोद अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विनोद अग्रवाल यांना डावलून काँग्रेसमधून आलेल्या गोपाल अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे विनोद अग्रवाल यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तर मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून गोंदियाचे पालकमंत्री परिणय फुके हे विनोद अग्रवाल यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी विनंती करण्यासाठी आले होते. मात्र, विनोद अग्रवाल यांच्या समर्थकांनी फुके यांना विरोध केला. त्यामुळे मंत्री फुके यांना रिकाम्या हातानेच परत जावे लागले. त्यामुळे आता गोंदियातील राजकारण तापू लागले आहे.
हेही वाचा - भुसावळातील सामूहिक हत्याकांडाला राजकीय पूर्ववैमनस्याची किनार