ETV Bharat / state

..अन् तहसीलदारांनी हाकल्या बैलजोड्या, गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच ‘अशीही एक रेती चोरी’ - गोंदियात वाळू चोरी

आधुनिक जगात विज्ञान-तंत्रज्ञानाने कधी नव्हे तेवढी नेत्रदीपक प्रगती केली आहे. लोकोपयोगी चांगल्या कामांसाठी जेवढा या अत्याधुनिक यंत्र-तंत्राचा वापर केला जातो, किंबहुना तेवढाच अवैध कामांसाठी सुद्धा केला जातो. मात्र, अवैध कामासाठी जुन्या पद्धतीचा वापर चोरांनी केल्यामुळे त्यांच्यावर जप्तीची कारवाई करणे तहसीलदारांना चांगलीच महागात पडते.

oxen driven by tehsildar
oxen driven by tehsildar
author img

By

Published : Mar 23, 2021, 4:56 PM IST

Updated : Mar 23, 2021, 5:07 PM IST

गोंदिया - आधुनिक जगात विज्ञान-तंत्रज्ञानाने कधी नव्हे तेवढी नेत्रदीपक प्रगती केली आहे. लोकोपयोगी चांगल्या कामांसाठी जेवढा या अत्याधुनिक यंत्र-तंत्राचा वापर केला जातो, किंबहुना तेवढाच अवैध कामांसाठी सुद्धा केला जातो. मात्र, अवैध कामासाठी जुन्या पद्धतीचा वापर चोरांनी केल्यामुळे त्यांच्यावर जप्तीची कारवाई करणे तहसीलदारांना चांगलीच महागात पडते. कधी नव्हे ती गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली की, चक्क तहसीलदार व नायब तहसीलदारांना तब्बल 3 किमीपर्यंत 3 बैल जोड्यांना हाकत न्यावे लागले.

आपल्याला नेहमी ट्रॅक्टर-ट्राली, टिप्परने नदी-नाल्याच्या घाटावरून माफिया रेतीची तस्करी करीत असल्याचे तसेच अनेकदा त्यांच्यावर कारवाई करून दंड ठोठावण्यात आल्याचे ऐकायला बघायला किंवा वाचायला मिळते. मात्र, तिरोडा तालुक्यात असाही एक रेती चोरी प्रकरण घडले की प्रशासकीय अधिकार्‍यांना बैलांसह तब्बल 3 किमीची पायदळ वारी करावी लागली.

..अन् तहसीलदारांनी हाकल्या बैलजोड्या
तहसीलदारांनी केल्या रेतीसह तीन बैलबंड्या जप्त -
अद्याप रेतीघातांचा लिलाव झाला नाही. तालुक्यात घरकुल बांधणीचे काम सुरू आहेत. शासनाच्या आदेशानुसार तालुक्यातील पिपरिया व मांडवी असे 2 घाट घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देण्यासाठी निश्चित केले आहे. मात्र रेती मिळत नसल्यामुळे ट्रॅक्टर-ट्राली, टिप्परने रेती चोरी सुरूच आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई अनेकदा होत नाही, त्यातच तिरोडा येथील तहसीलदार प्रशांत घोरूडे यांनी कवलेवाडा येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून रेती भरून नेणार्‍या 3 शेतकर्‍यांच्या बैलबंड्या पकडून जप्त केल्या. पंचनामा करून एकूण 3 जोड्या म्हणजे 6 बैलांसह शेतकर्‍यांच्या 3 बंड्या तहसील कार्यालय परिसरात जमा करून दंड आकारण्यात आला. तानेश्वर बारकन टेंभरे, धर्मेंद्र छोटू कटरे व संतोष प्रेमलाल टेंभरे (तिन्ही रा. कवलेवाडा) अशी बैलबंडी मालकांची नावे आहेत.

हे ही वाचा - मनसुख हिरेन हत्या प्रकरण : एटीएसने दमणमधून ताब्यात घेतली व्होल्वो कार

चार्‍या-पाण्याविना दिवसभर होत्या सर्जा-राजाच्या जोड्या -

दरम्यान बैलबंडीधारकांनी सोडण्याची विनंती तहसीलदारांना केली. पण तहसीलदारांनी आकारलेले शासकीय दंड भरून बैलबंड्या नेण्यास सांगितले. दंड भरण्यास पैसे नसल्यामुळे शेतकर्‍यांनी आपल्या मुक्या जनावरांचे दिवसभर चार्‍यापाण्याविना काय होईल, असा विचार करून बैलांना नेण्याची विनंती केली. तहसीलदारांनीही रेतीने भरलेल्या बंड्या ठेवून बैलांना नेण्यास सांगितले. मात्र शेतकर्‍यांनी आधी बैलांना सोडून परत त्यांना तिथेच आणून बांधून ठेवले व निघून गेले. या सर्व प्रकारामुळे सर्जा राज्याच्या तिन्ही जोड्या दिवसभर चार्‍या पाण्याविनाच आपल्या सुटकेची वाट पाहत तहसील कार्यालयाच्या आवारात बांधून होते.

बैलांमुळे प्रशासकीय अधिकार्‍यांना करावी लागली 3 किमीची पायदळ वारी -

तहसीलदार प्रशांत घोरुडे, नायब तहसीलदार नागपुरे, नायब तहसीलदार वरखडे व इतर कर्मचारी बाहेर आले. सायंकाळ होत होती. दिवसभर उपाशी असलेल्या बैलांना सोडण्यास सांगण्यात आले. त्यानंतर तहसीलदार, दोन्ही नायब तहसीलदार व इतर कर्मचार्‍यांनी बैलजोड्यांच्या मागोमाग पायी चालत ग्राम कवलेवाडा येथे त्यांच्या मालकांच्या घरी सोडून दिले. तिरोडा तहसील कार्यालय ते ग्राम कवलेवाडा दरम्यानचे अंतर जवळपास 3 किमी आहे. नेहमी चारचाकी वाहनांनी फिरणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांना हा अंतर मात्र बैलांसह पायदळवारीनेच पूर्ण करावा लागला, हे विशेष. शेवटी प्रती बैलबंडी एक हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Last Updated : Mar 23, 2021, 5:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.