ETV Bharat / state

Womens Day Gondia : महिला दिनाच्या औचित्यावर गोंदियात सायकल रॅलीचे आयोजन; जिल्हाधिकारी नयना गुंडेंनी घेतला सहभाग - महिला दिवस गोंदिया जिल्हाधिकारी नयना गुंडे

महिला दिनाचे औचित्त ( Womens Day Gondia ) साधून गोंदियातील सायकल संडे ग्रुपच्या वतीने ( Cycle Sunday Group Gondia ) आज खास महिलांसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. ( Organizing a cycle rally in Gondia ) या उपक्रमात जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी ( Nayana Gunde Participate Cycle Rally Gondia ) सहभाग घेत सायकल चालविण्याचा आनंद घेत पर्यावरण बचाव सेहत बनावचा संदेश दिला आहे.

Organizing a cycle rally in Gondia on the occasion of Women's Day
गोंदियात सायकल रॅलीचे आयोजन
author img

By

Published : Mar 6, 2022, 1:08 PM IST

Updated : Mar 6, 2022, 2:49 PM IST

गोंदिया - महिला दिनाचे औचित्त ( Womens Day Gondia ) साधून गोंदियातील सायकल संडे ग्रुपच्या वतीने ( Cycle Sunday Group Gondia ) आज खास महिलांसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. ( Organizing a cycle rally in Gondia ) या उपक्रमात जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी ( Nayana Gunde Participate Cycle Rally Gondia ) सहभाग घेत सायकल चालविण्याचा आनंद घेत पर्यावरण बचाव सेहत बनावचा संदेश दिला आहे. या अभिनव उपक्रमामध्ये गोंदिया शहरातील शेकडो महिला व तरुणींनी मोठ्या संख्येत भाग घेतला.

प्रतिक्रिया

गोंदिया शहरातील सायकल संडे या ग्रुपच्या वतीने "एक दिन सायकल के नाम" हा उपक्रम मागील २०७ आठवड्यापासून चालवित आहेत. या उपक्रमांतर्गत दर आठवड्यात रविवारच्या दिवशी शहरातील तरुण तरुणी तसेच वयोवृद्ध त्याचप्रमाणे लहान मूलदेखील सहभाग घेतात. या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल आणि मानवी जीवन सुदृढ करण्यासाठी जवळपास २० ते २५ किलोमीटर सायकल चालवून सामाजिक संदेश देत असतात.

गोंदियातील सायकल संडे गुपमध्ये १० वर्षाच्या तरुणांना पासून तर ८० वर्षांचा वृद्ध व्यक्तीदेखील प्रामुख्याने सहभाग नोंदवित आहेत. गोंदियातील सायकल पट्टू मुनालाल यादव यांचा ८०वा वाढदिवसदेखील या निमित्ताने आज सायकल संडेच्या वतीने साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे महिला दिनाच्या निमित्ताने जिल्ह्याधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते देखील केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला.

हेही वाचा - Jayant Patil Nashik : मराठी माणूस मराठी माणसांना मोठं करण्यात कमी पडतो - जलसंपदामंत्री जयंत पाटील

सायकलिंग संडेची सुरुवात -

२०१७मध्ये गोंदिया येथील काही युवक-युवतींनी सायकलिंग संडे ग्रुप सुरू करत 'एक दिन सायकल के नाम' हा उपक्रम सुरू केला. प्रत्येक रविवारी सकाळी एक ते दीड तास ते २० ते २५ किलोमीटर सायकल चालवून शहरातील नागरिकांना निरोगी आरोग्य व प्रभूषण मुक्ती ठेवण्याचे संदेश देण्यात येत आहे. आज ६ मार्चला सायकलिंग संडे ग्रुपला २०७ आठवडे पूर्ण झाले आहेत.

Womens Day Gondia
गोंदियात सायकल रॅलीचे आयोजन

कोरोनाकाळातही या सायकलिंग संडे ग्रुपने कोरोनापासुन दूर राहायचे असेल तर सायकल चालवुन आपली रोगप्रतिरोग शक्ती वाढविण्याची गरज आहे. त्याकरीता सायकल चालावा व आपली रोगप्रतिरोग शक्ती वाढवावी, असा हि संदेश देत होते. याग्रुप मधील दोन युवक अमन व शांती, निरोगी आरोग्य, प्रदूषण मुक्त भारतचा संदेश घेऊन तब्बल हजारो किलोमीटरची यात्रा करून बाघा बॉडर जम्मू-काश्मीर पर्यंत पोहोचले. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन वर्षांपासून या ग्रुपचे सदस्य गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथील प्रसिद्ध बम्लेश्वरीचे दर्शन घेण्यासाठी व सायकल चालवून पर्यावरण बचाव सेहत बनावचा संदेश देत आहेत.

Last Updated : Mar 6, 2022, 2:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.