गोंदिया - शहराच्या सर्कस ग्राउंड परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकावर अज्ञाताने मानेवर गोळ्या झाडल्या. यात या व्यावसायिकाचा मृत्यू झाला. ही घटना 21 ऑगस्टला सकाळी आठ वाजेदरम्यान घडली. अशोक कौशिक असे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे नाव आहे.
काय आहे घटना?
अशोक कौशिक यांचा सर्कस ग्राउंड परिसरात एनसीसी नावाने ट्रान्सपोर्ट बिझनेस आहे. ते रोजच्या प्रमाणे शनिवारीही सकाळी आठ वाजेदरम्यान घराबाहेर निघाले होते. ते ट्रान्सपोर्ट जवळून जात असताना एका अज्ञाताने पाठीमागून येत त्यांच्या मानेवर बंदुकीने गोळी झाडत पळ काढला.
स्वतःजवळील बंदूकदेखील आरोपीने घटनास्थळी फेकून दिली आणि घटना स्थळावरून पळ काढला. रस्त्यावर जाणाऱ्या लोकांनी अशोक कौशिक यांचा मृतदेह पहिल्यावर पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर गोंदिया शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला होता. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - नागपुरातील गंगा-जमुना वस्तीत तणाव, आंदोलक-विरोधकांमध्ये धक्काबुक्की