ETV Bharat / state

चिंताजनक..! गोंदियात वाढतोय कुपोषणाचा आकडा

मागील वर्षाच्या तुलनेत कुपोषित मुलांमध्ये वाढ झाल्याची माहिती बालविकास प्रकल्पातर्फे देण्यात आली आहे. सध्या कुपोषित बालकांची संख्या ९८ वर पोहोचली आहे. वाढती आकडेवाढ बघता विभागासाठीच नाहीतर समाजासाठीही हा चिंतेचा विषय झाला आहे.

गोंदिया
गोंदिया
author img

By

Published : Aug 29, 2020, 8:46 AM IST

Updated : Aug 29, 2020, 1:57 PM IST

गोंदिया - कुपोषण मुक्तीसाठी सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. परंतु, कुपोषण कमी होण्याऐवजी ते वाढतच चालल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. गोंदिया शहरासह ग्रामीण भागातही कुपोषितांचा आकडा वाढत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कुपोषित मुलांमध्ये वाढ झाल्याची माहिती बालविकास प्रकल्पातर्फे देण्यात आली आहे. सध्या कुपोषित बालकांची संख्या ९८ वर पोहोचली आहे. वाढती आकडेवाढ बघता विभागासाठीच नाहीतर समाजासाठीही हा चिंतेचा विषय झाला आहे.

भारताला कुपोषणमुक्त करायचे आहे, असे नेतेमंडळी म्हणत असतात. परंतु, कुपोषणाचा आकडा कमी होण्याऐवजी वाढतच आहे. गोंदिया शहरात ८२ तर तिरोडा शहरात १५ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. या अंगणवाडी केंद्रामध्ये ९० सेविका आणि ९१ सहायिका कार्यरत आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून ६ महिन्यांपासून ३ वर्षांच्या बालकांना घरपोहोच पौष्टिक आहार, ३ वर्षांपासून ६ वर्षांपर्यंतच्या बालकांना अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण आहार दिला जात आहे. कोविड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी लाभार्थी मुलांना घरी कच्चा आहार पोहोचविण्यात येत असून एका मुलापाठीमागे २१० रुपये खर्च करण्यात येत आहे. तसेच वेळोवेळी वजन व आरोग्य तपासणी करून संबंधित मुलांच्या पालकांना मार्गदर्शन केले जात आहे.

हेही वाचा - महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड, गंगापूरमधील धक्कादायक प्रकार

गोंदिया व तिरोडा शहरात ९८ कुपोषित मुलांची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी ही संख्या कमी होती. तसेच सामान्य श्रेणीमध्ये २२५ मुले समाविष्ट आहेत. कुपोषणावर कोट्यवधींचा खर्च करूनही सरकारला अपेक्षित यश मिळत नसल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. या मुलांना कुपोषणापासून वाचवण्यासाठी त्यांच्या पालकांना वेळोवेळी मार्गदशन केले जात आहे.

गोंदियात वाढतोय कुपोषणाचा आकडा
गोंदिया प्रतिनिधी

Last Updated : Aug 29, 2020, 1:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.