ETV Bharat / state

अंत्यविधीसाठी सरपण मिळेना, नातेवाईंकांनी मृतदेह ठेवला वन विभागाच्या कार्यालयासमोर - forest office news

मृतदेह जाळण्यासाठी वन विभागाच्या आगारात लाकडे नाहीत. शहरात पर्यायी सुविधा नाही. विद्युत शवदाहिनी नाही. मग मृतदेहाचे करावे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी मृतदेह चक्क वन विभागाच्या कार्यालयासमोर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (९ जून) दुपारच्या सुमारास घडला.

no wood for the funeral, body taken to the forest office by Relatives
अंत्यविधीसाठी लाकडे नाहीत म्हणून मृतदेह ठेवला वन विभाग कार्यालयासमोर...
author img

By

Published : Jun 10, 2020, 10:20 AM IST

Updated : Jun 10, 2020, 11:07 AM IST

गोंदिया - मृतदेह जाळण्यासाठी वन विभागाच्या आगारात लाकडे नाहीत. शहरात पर्यायी सुविधा नाही. विद्युत शवदाहिनी नाही. मग मृतदेहाचे करावे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी मृतदेह चक्क वन विभागाच्या कार्यालयासमोर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (९ जून) दुपारच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे वन विभागातील कार्यालयात खळबळ उडाली.

अर्जुनी-मोरगाव येथील नरेश तरजुले या युवकाचे निधन झाले. त्याच्या मृतदेहावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. स्थानिक स्मशानभूमीत विद्युत शव दाहिनीची सुविधा नाही. यामुळे वन आगारातून लाकडे विकत घेऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात. नरेशचे पार्थिव वन विभागाच्या कार्यालयात आणल्यानंतर आप्तेष्टांनी वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्गे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत दुर्गे यांनी आपल्या आगारात लाकडाचा साठा नसल्याने सांगत लाकडे नावेगबांधच्या आगारातून आणण्याचा सल्ला दिला.

अंत्यविधीसाठी लाकडे नाहीत म्हणून मृतदेह ठेवला वन विभाग कार्यालयासमोर...

नावेगबांधचे आगार त्या ठिकाणाहून १५ किलोमीटर अंतरावर आहे. तिथून लाकडे आणणे सर्वसामान्य कुटुंबीय तरजुले यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हते. तेव्हा त्यांनी नरेश याचे पार्थिव वन विभागाच्या कार्यालयासमोर आणून ठेवला. यामुळे वन विभागाच्या कार्यालयात खळबळ उडाली.

गावकऱ्यांनी ही बाब आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना सांगितली. तेव्हा आमदार चंद्रिकापुरे यांनी उपवनरक्षक युवराज यांच्याशी फोनवर संवाद साधला. त्यानंतर हा प्रश्न निकाली लागला. वन परिक्षेत्र अधिकारी दुर्गे आणि क्षेत्र साहाय्यक गोटेफोडे यांनी मृताच्या नातेवाईकांना वन आगारात येण्यास सांगितले. अखेर त्यांनी अंत्यसंस्कारापुरती लाकडे उपलब्ध करून दिली. तेव्हा नरेश याच्या पार्थिवाला अग्नि देण्यात आला.

हेही वाचा - घोरपडीची शिकार करणारा आरोपी वनविभागाच्या जाळ्यात

हेही वाचा - घरचे रागावले म्हणून दोघी मैत्रिणींनी मारली विहिरीत उडी, एक बचावली

Last Updated : Jun 10, 2020, 11:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.