ETV Bharat / state

महाशिवरात्री निमित्त गोमुख-प्रतापगडच्या यात्रेसाठी १४ विशेष बसची सोय

महाशिवरात्रीनिमित्त गोंदिया आगाराने गायमुख तसेच प्रतापगड यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांसाठी १४ विशेष बसची व्यवस्था केली आहे. यात्रेत हजारो संख्येने येणाऱ्या भाविकांना होणारा त्रास लक्षात घेता गोंदिया आगाराने दर अर्ध्या तासाला बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

महाशिवरात्री यात्रेसाठी १४ बसेसची विशेष व्यवस्था, गोंदिया आगाराचा उपक्रम

author img

By

Published : Feb 20, 2020, 5:09 PM IST

गोंदिया - महाशिवरात्रीनिमित्त गायमुख तसेच प्रतापगड येथील यात्रेत सहभागी होण्यासाठी यात्रा करणाऱ्या प्रवाशांची सुविधा लक्षात घेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराकडून विशेष १४ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेस दर अर्ध्या तासाने गोंदिया आगारातून सुटणार आहेत.

महाशिवरात्री यात्रेसाठी १४ बसेसची विशेष व्यवस्था, गोंदिया आगाराचा उपक्रम

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गायमुख तसेच गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगड येथील महादेवाचे मंदिर प्रसिद्ध असून महाशिवरात्रीनिमित्त येथे दरवर्षी यात्रा भरते. यात्रेत हजारो संख्येने येणाऱ्या भाविकांना होणारा त्रास लक्षात घेता एस.टी. आगाराने दर अर्ध्या तासाला बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

या यात्रेत गोंदिया, भंडारा जिल्ह्यासह लगतच्या अन्य जिल्ह्यातील भाविक महादेवाच्या दर्शनासाठी अगत्याने हजेरी लावतात. मात्र, दोन्ही स्थळ रेल्वे मार्गावर नसल्यामुळे भाविकांना बसने प्रवास करावा लागतो. ही बाब लक्षात घेत गोंदिया आगाराने जिल्ह्यातील भाविकांच्या सोयीसाठी महाशिवरात्री निमित्त २१ फेब्रुवारीला १४ बसेसची व्यवस्था केली आहे. यातील ९ बसेस गायमुखासाठी असून सकाळी ५:३० ते रात्री ९ दरम्यान दर अर्ध्या तासाने फेरी मारणार आहेत.

हेही वाचा - गोंदियात मजूर घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात; एक जागीच ठार १२ जखमी

त्याचप्रकारे प्रतापगडसाठी ५ बसेस असून त्यासुध्दा सकाळी ५:३० ते ९ रात्री दरम्यान प्रत्येक अर्ध्या तासाने फेरी मारणार आहेत. आगाराने केलेल्या या व्यवस्थेमुळे भाविकांना सुविधा होणार असून त्यांना महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

हेही वाचा - शासनाच्या विविध योजनांच्या माहितीसाठी महाशिबिराचे आयोजन; नक्षलग्रस्त भागातील नागरिकांनी घेतला लाभ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.