गोंदिया - गोंदियामध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते गप्पू गुप्ता यांनी राष्ट्रवादीला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काल मुंबईमध्ये विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गप्पू गुप्ता हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय समजले जातात.
गुप्ता हे मागील विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. तर नगर परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस प्रवेशानंतर गुप्ता यांचे गोंदियामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.