गोंदिया - जिल्ह्यतील सालेकसा तालुका हा नक्षलग्रस्त असून जंगलाने व्यापलेला आहे. सालेकसा पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या पिपरिया या गावात आज(सोमवार) सकाळी रस्त्यावर नक्षली पत्रके आढळली आहेत. या पत्रकात नक्षल चळवळीच्या 'पीएलजीए'मध्ये सामील व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - 'मी पुन्हा येईन... नंतर फडणवीसांचे आपण येतोच.. येतोच.. येतोच..'
सध्या सालेकसा येथील कचारगड येथे पाच दिवसीय यात्रा सुरू आहे. या यात्रेत लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी होतात. या कचारगड गुफेतून आदिवासी बांधवांचा उगम झालेला असून, दरवर्षी ही यात्रा कोयापुणेम पौर्णिमेला सुरू होते. तसेच या यात्रेसाठी भारतातील तब्बल १८ राज्यातून आदिवासी बांधव एकत्रित येतात. आदिवासी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी येऊन आपल्या आराध्य देवतेचे दर्शन करून आपली संस्कृती जपत असतात.