ETV Bharat / state

१५० वर्ष जुनी परंपरा आजही पाळताहेत खोडशिवनी गावातील नागरिक - नवरात्रौत्सव गोंदिया २०१९

नवरात्रीच्या निमित्ताने सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी येथे दरवर्षी नवरात्री उत्सवादरम्यान गावातील प्राचीन हनुमान मंदिरात घटस्थापनेच्या दिवशी ७ दिवस अखंड ज्योत पेटवून भजन-किर्तनाचा कार्यक्रम केला जातो. ७ दिवसांच्या अवधीत तब्बल १६८ तास भजन दरवर्षी या ठिकाणी गायल्या जात असून पूर्वजांपासून सुरू असलेली हि परंपरा आजही येथील हनुमान मंदिर समिती जपून आहे.

१५० वर्ष जुनी परंपरा
author img

By

Published : Oct 4, 2019, 9:12 AM IST

Updated : Oct 4, 2019, 1:13 PM IST

गोंदिया - देशात सर्वत्र नवरात्रीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. तर, जिल्ह्यातील खोडशिवणी येथे मात्र नवरात्री दरम्यान एक आगळीवेगळी परंपरा गेल्या १५० हुन अधिक वर्षांपासून जपली जात आहे. या गावात नवरात्री दरम्यान ७ दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचा पाठ केला जातो. यावेळी गावातल्या हनुमान मंदिरात ७ दिवस अखंड ज्योत पेटवून भजन मंडळाकडून भजन गायले जाते. १६ भजन मंडळांपैकी प्रत्येक भजन मंडळ दीड तासाप्रमाणे भजन गायन करत असतात.

खोडशिवनी गावाती १५० वर्ष जुनी आगळीवेगळी परंपरा

नवरात्रीच्या निमित्ताने सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी येथे दरवर्षी नवरात्री उत्सवादरम्यान गावातील प्राचीन हनुमान मंदिरात घटस्थापनेच्या दिवशी ७ दिवस अखंड ज्योत पेटवून भजन-किर्तनाचा कार्यक्रम केला जातो. याठिकाणी १६ भजन मंडळ आहे. प्रत्येक भजन मंडळाला प्रत्येकी दीड तास भजन गाण्याकरिता देण्यात येतात व त्या भजन मंडळाचा अवधी संपताच क्षणातच खंड न पडू देता दुसरे भजन मंडळ आपले भजन गाण्यास सुरुवात करीत असते. अशाप्रकारे एकूण ७ दिवसांच्या अवधीत तब्बल १६८ तास भजन दरवर्षी या ठिकाणी गायल्या जात असून पूर्वजांपासून सुरु असलेली हि परंपरा आजही येथील हनुमान मंदिर समिती जपून आहे.

हेही वाचा - ही असली भाजप व नकली भाजपमधील लढाई - अग्रवाल
या सप्ताहादरम्यान गावातील वातावरण भक्तिमय होत असते. शिवाय गावात अन्य ठिकाणी कुठलीही पूजा अर्चना होत नाही. या उत्सवाला गावातील महिला-पुरूष मोठ्या हिरिरीने भाग घेतात. गावात स्वच्छता करून रांगोळी काढून मंदिर परिसराची सजावट करण्यात येत असते. शिवाय भजन मंडळाचे मंदिरातील भजन आटोपल्यानंतर हे भजन मंडळ गावातील प्रत्येक गल्ली-बोळीतून फिरून भजनाच्या गजरात गावातून फेरी मारत असतात. त्यामुळे या भक्तिमय वातावरणात आणखीनच भर पाडीत असते. हि परंपरा पिढ्यानपिढ्या अशीच सुरु राहावी अशी भावना या गावकऱ्यांची आजही आहे.

हेही वाचा - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अग्रवाल यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 03-10-2019
Feed By :- Reporter App 
District :- GONDIA
File Name :- mh_gon_03.oct.19_navratar utsav_7204243
तब्बल १६८ तास सतत भजन सुरूच १६ बजन मंडळ सतत ९ दिवस करतात भजन  
Anchor:- देशात सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम आहे, तर गोंदिया जिल्ह्यातील खोडशिवणी या गावात सुद्धा नवरात्र दरम्यान एक अनोखी परंपरा या गावात आज नव्हे तर गेल्या तब्बल दीडशे हुन अधिक वर्षांपासून जपली जात असून या परंपरेमुळे या गावात सर्वधर्म समभावाणे मंदिरात एकत्र येतात व सुरु  होतो मातेचा अखंडपणे चालणार गजर  तर काय आहे हि परंपरा चला बघू या इटिव्ही चा खास रिपोर्ट. 
VO:- आज सर्वत्र देशात नवरात्र ची धूम असली तरीही सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी या गावाने जपलेली हि परंपरा थोडी अनोखी आहे गेल्या दीडशे  वर्षांपासून अधिक काळापासून या गावात  नवरात्र उत्सव दरम्यान अखंडपणे सात दिवस रात्र भजन गायले जाते तर हि परंपरा येथील गावकऱ्यांनी  आजही सुरु  ठेवली असून दरवर्षी गावातील प्राचीन हनुमान मंदिरात घटस्थापनेचा दिवशी मंदिरात  ज्योत प्रज्वलित करून हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येत असतो तर घटस्थापनेचा दिवसापासून तर ज्योती विसर्जन पर्यन्त विविध भजन मंडळ तर्फे कुठलेही खंड न पडता  दिवस रात्र येथे भजन गायल्या जात असते तर या ठिकाणी १६ भजन मंडळ असून प्रत्येक भजन मंडळाला प्रत्येकी दीड तास भजन गाण्याकरिता देण्यात येतात व त्या भजन मंडळाचा अवधी संपताच क्षणातच खंड न पडू देता दुसरे भजन मंडळ आपले भजन गाण्यास सुरुवात करीत असते असे एकूण सात दिवसाचा अवधीत तब्बल १६८ तास भजन दरवर्षी या ठिकाणी गायल्या जात असून पूर्वजांपासून सुरु असलेली हि परंपरा आजही येथील हनुमान मंदिर समिती जपून आहे.
BYTE:- भृगराज  परशुरामकर ( मंदिर समिती अध्यक्ष, पिवळा कुर्ता घातलेला)
BYTE:-  रामदास मस्के  (मंदिर समिती सचिव)
VO :- तर १६ भजनी मंडळाचा माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून या गावात आजही हि अनोखी परंपरा सुरु असून या सप्ताह दरम्यान गावाचे वातावरण भक्तिमय होत असते शिवाय गावात अन्य ठिकाणी कुठलीही पूजा अर्चना होत नाही तर या उत्सवात गावातील महिला युद्ध मोठ्या हिरिरीने भाग घेत गावात स्वच्छता, करून रांगोळी काढून  मंदिर परिसराची सजावट करण्यात येत असते शिवाय भजन मंडळाचे मंदिरातील भजन आटोपल्या नंतर गावातील प्रत्येक गल्लो, गल्लीतून हे भजन मंडळ फिरून या भक्तिमय वातावरणात आणखीनच भर पाडीत असतात त्यामुळे हि परंपरा अशीच पिढ्यानपिढ्या अशीच सुरु राहावी अशी भावना या गावकऱ्यांची आजही आहे.
BYTE:- इंदू परशुरामकर (पोलीस पाटील, लाला साडी घातलेली)
VO:- एकंदरीतच आज खोडशिवणी  या गावात आजही जपली जाणारी हि परंपरा अनोखी असून उत्सव दरम्यान  गावातील इतर जाती, धर्माचे नागरिक सुद्धा मोठ्या उत्साहाने या उत्सवात सहभागी होत असतात तर शेवटचा दिवशी ज्योतीचे विसर्जन करून गावात दहीकाला, गावभोजन करून या सप्ताहाचा समारोप करण्यात येत असतो Body:VO :- Conclusion:
Last Updated : Oct 4, 2019, 1:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.