ETV Bharat / state

महिलांनी बनविले नैसर्गिक होळीचे रंग; गोंदियामध्ये मागणी वाढली - Gondia latest news

शासन प्रशासनाकडून कितीही नैसर्गिक रंग उपयोग करण्याचा प्रचार-प्रसार केला जातो. तरी ही रंग उत्सव खेळणारे हौसी कृत्रिम रंगानेच रंग उत्सव खेळण्यासाठी आकर्षित होतात. मात्र या रंगाने विविध आजार होण्याची शक्यता असते. मात्र गोंदिया येथील महिला बचत गटाच्या महिलांनी एक विशेष प्रशिक्षण घेऊन शुन्य भांडवलापासून नैसर्गिक रंग बनविण्याचा लघू उद्योग सुरु केला आहे.

महिलांनी बनविले नैसर्गिक होळीचे रंग; गोंदियामध्ये मागणी वाढली

author img

By

Published : Mar 27, 2021, 8:26 PM IST

गोंदिया - शासन प्रशासनाकडून कितीही नैसर्गिक रंग उपयोग करण्याचा प्रचार-प्रसार केला जातो. तरी ही रंग उत्सव खेळणारे हौसी कृत्रिम रंगानेच रंग उत्सव खेळण्यासाठी आकर्षित होतात. मात्र या रंगाने विविध आजार होण्याची शक्यता असते. मात्र गोंदिया येथील महिला बचत गटाच्या महिलांनी एक विशेष प्रशिक्षण घेऊन शुन्य भांडवलापासून नैसर्गिक रंग बनविण्याचा लघु उद्योग सुरु केला आहे. एक छोट्याश्या खोलीत महिला एकत्रित येऊन गुलाबाचे फुल, शेवंती फुल, पळस फुल, गोंदा फुल, कळूलिबांचा पाला, बिट, लिंबू इत्यादी पासून रंगीबेरंगी गुलाल तयार करीत आहेत. या नैसर्गिक रंगांना गोंदियात चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या ४ ते ५ दिवसातच हजारो रंगाचे पॅकेट विकल्या गेले आहेत. या रंगाने महिला बचत गटांना कोरोना काळात आर्थिक बळ मिळाले आहे. ही संकल्पना सुमन बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा शिक्षिका वर्षा भांडारकर यांच्यामुळे मिळाली आहे.

महिलांनी बनविले नैसर्गिक होळीचे रंग; गोंदियामध्ये मागणी वाढली

आधुनिक युगात रासायनिक रंगांचा उपयोग अधिक वाढला-

होळी उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्व मानले जाते. होळीच्या दिवशी होळीची विविध रंगानी पूजा अर्चना करून दहन केले जाते. दुसऱ्या दिवशी रंग उत्सवाचा म्हणजेच धुलिवंदनाचे आयोजन केले जाते. या दिवशी सर्व मत भेद विसरून एक दुसऱ्यांवर रंग उढविले जातात. भारतातील सर्व राज्यात त्यांच्या संस्कृतीप्रमाणे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या निमित्ताने या दोन दिवसात कोट्यांविधी रुपयाचा रंग उधळले जातात. मात्र उपयोगात येणारा रंग रासायनिक पद्धतींने तयार केला जातो. त्यामुळे त्वचेवर हानिकारक परिणाम दिसून येतात. पूर्वी हा उत्सव पळसाच्या फुलांपासून ते सुगंधित फुलांच्या रसापासून रंग तयार करून रंग उत्सव साजरा केला जात असे. मात्र आधुनिक युगात रासायनिक रंगांचा उपयोग अधिक वाढला आहे.

महिलांनी बनविले नैसर्गिक होळीचे रं
महिलांनी बनविले नैसर्गिक होळीचे रं

कार्यशाळेत शहरातील पाच महिला बचत गटातील महिलांनी घेतले प्रशिक्षण-

पूर्वी प्रमाणेच नैसर्गिक रंगाचा उपयोग करून पर्यावरण पूरक होळीचा सण साजरा व्हावा. या उद्देशाने संस्थेचा अध्यक्षा शिक्षिका वर्षा भांडारकर यांनी एक संकल्पना साकार केली. मंदिरात निर्माल्य व पळस फुल शेवंती फुल, गोंदा फुल, गुलाब फुल, कळूलिंबाचा पाला, बिट, लिंबू, हळद यांचे मिश्रण करून आरोग्यदायी नैसर्गिक रंग तयार करण्याची कार्यशाळा सुरु केली. या कार्यशाळेत शहरातील पाच महिला बचत गटातील महिलांनी प्रशिक्षण घेऊन. रंग बनविण्यास सुरवात केली. या रंगाची मागणी व विक्री कशी करायची म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळने भर दिला. व अवघ्या ४ ते ५ दिवसातच हे नैसर्गिक रंग गोंदियाच्या पर्यावरण प्रेमींच्या घरा-घरा पर्यंत पोहचू लागला. तसेच या रंगांची मागणी येवढी वाढली की महिलांना हा रंग बनविण्यासाठी दिवस-रात्र एक करावा लागत आहे. नैसर्गिक रंगाने कोरोना काळात महिलांना आर्थिक बळ मिळाल्याने त्यांच्या चाऱ्यावर आनंद झळकत आहे.

महिलांनी बनविले नैसर्गिक होळीचे रं
महिलांनी बनविले नैसर्गिक होळीचे रं

हेही वाचा- विदेशी मद्याची गाडी पलटी; मग काय सुरू झाली पळवापळवी..! (video)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.