गोंदिया - जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध अपक्ष असे लढतीचे चित्र आहे. काँग्रेसचे गोंदिया विधानसभा मतदारसंघातील आमदार गोपालदास अग्रवाल हे याआधी पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. यंदा सहाव्या वेळी आमदार बनण्यासाठी ते सज्ज असून, स्वत:चा रेकॉर्ड तोडण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसला राम-राम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवत भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
गोपालदास अग्रवाल हे गेल्या 27 वर्षांच्या राजकारणात दोन वेळा विधानपरिषद सदस्य झाले असून, तीनदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. केंद्राप्रमाणेच राज्यातही भाजप सरकार येणार असल्याने गोंदियाचा वेगाने विकास होणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.