ETV Bharat / state

आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली ! बच्चे कंपनीला स्पायडरमॅन व छोटा भीमचे आकर्षण - gondiya news

रक्षाबंधन सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने घरोघरी आणि बाजारपेठेत आनंदी वातावरण आहे. शहरातील विविध भागात राख्यांनी दुकाने सजली आहेत. लहान-मोठ्यांची उत्साहाने राख्यांची खरेदी सुरू झाली आहे.

राखी
author img

By

Published : Aug 12, 2019, 6:31 PM IST

Updated : Aug 13, 2019, 9:25 AM IST

गोंदिया- बहीण-भावाच्या नात्यासाठी भाऊबीज व रक्षाबंधन असे दोन सण साजरे होतात. यातील रक्षाबंधन सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने घरोघरी आणि बाजारपेठेत आनंदी वातावरण तयार झाले आहे. शहरातील विविध भागात राख्यांनी दुकाने थाटण्यात आली असून लहान-मोठ्यांची उत्साहाने खरेदी सुरू झाली आहे.

आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली ! बच्चे कंपनीला स्पायडरमॅन व छोटा भीमचे आकर्षण

यंदा देशात हातांनी तयार होत असलेल्या राख्यांनाच मागणी जास्त आहे. बाजापेठेत रक्षाबंधनानिमित्त तीनशे ते चारशे आकर्षक असे राख्यांचे प्रकार विक्रीला आलेले आहेत. काही सामाजिक संस्थांनी राख्या तयार केल्या असून ते सुध्दा घरोघरी राख्या विक्री करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आकर्षक राख्या तयार करणा-या व्यापा-यांनी मोराच्या पिसापासून वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पूर्वी लहान मुलांसाठी स्पंजचा वापर करून राख्या तयार केल्या जात. मात्र, त्या पध्दतीच्या राख्यांचे प्रमाण कमी झाले आहे.

रेशीमच्या राख्यांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. राख्यामध्ये वेगवेगळे प्रकार उपलब्ध असले तरी यावेळी पर्यावरणाचा आणि पाणी वाचविण्याचा संदेश देण्याचा राख्या तयार करण्यात आल्या आहेत. शहरातील काही विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या असून त्यांची विक्री संस्थांमार्फत केली जात आहे. यावर्षीचे खास आकर्षक म्हणून लहान मुलांसाठी भिंतीवर चढणारा स्पायडरमॅन, मिकीमाउस, डोनाल्ड डक, स्टोन राखी, डिस्को लाईट, जु जु वंडरबॉय, टेडी बेअर आदि राख्या लहान मुलांचे आकर्षण ठरल्या आहेत.

राखी तयार करण्यासाठी लागणा-या साहित्याच्या दरात यावेळी १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत राखीच्या किमती २ टक्यांनी वाढल्या आहेत. दोन रूपयापासून ते ५०० रूपये किंमतीच्या राख्या विक्रीला आहेत. सॅटिन रिबीन वापरून तयार केलेल्या तुळशींचे मणी, रूद्राक्षाचा वापर केलेल्या राख्या २० रूपये डझनपासून २०० रूपये डझनपर्यंत विक्री होत आहे.

बच्चे कंपनीसाठी कार्टुन्सची छबी असलेल्या, अन खेळणे असलेल्या राख्या उपलब्ध झाल्या आहेत. बाहुबली सिनेमाच्या नावाच्या राख्यादेखील उपलब्ध आहेत. तर लहान मुलांमध्ये आकर्षण असलेल्या स्पिनरच्या राख्यादेखील यंदा आकर्षण ठरत आहेत. तसेच छोटा भीम, भीम अ‍ॅण्ड बाल गणेश, भीम अ‍ॅण्ड फ्रेण्ड्स, टॉम अ‍ॅण्ड जेरी, अ‍ॅग्री बर्ड, डोरेमॉन, मोटु-पतलू या कार्टुन्स असलेल्या राख्याही उपलब्ध आहेत. काही राख्यांमध्ये बटण दाबले की लाईट लागते. छोट्यांच्या राख्यांची किमत ३० ते ६० रूपयापर्यंत आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 12-08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- mh_gon_12.aug.19_rakhi_7204243
आकर्षक राख्यांनी सजली बाजारपेठ!
लहान मुलासाठी स्पायडरमॅन ते भीम च्या राख्या ठरल्या आकर्षक
Anchor :- कुटुंब संस्था प्रमाण मानणा-या समाजाला नातेसंबंधाला वेगळे महत्व आहे. प्रत्येक नात्याला जोडुन येणा-या भावना वेगळ्या, जबाबदा-या वेगळ्या हे ठरले आहे. परंपरांनी दृढ केलेल्या या नात्यापैकी एक असलेल्या बहीण-भावाच्या नात्यासाठी भाउबीज व रक्षाबंधन असे दोन सण साजरे होतात. अवघ्या तीन दिवसांवर रक्षाबंधन येउन ठेपल्याने घरोघरी आणि बाजारपेठेत आनंदी वातावरण तयार झाले आहे. शहरातील विविध भागात राख्यांनी दुकाने थाटण्यात आली असुन लहान-मोठ्यांची उत्साहाने खरेदी सुरू झाली आहे.
VO :- यंदा देशात हातांनी तयार होत असलेल्या राख्यांनाच मागणी जास्त आहे. बाजापेठेत रक्षाबंधना निमित्त तीनशे ते चारशे आकर्षक असे राख्यांचे प्रकार विक्रीला आलेले आहेत. काही सामाजीक संस्थांनी राख्या तयार केल्या असुन ते सुध्दा घरोघरी राख्या विक्री करीत आहेत. गेल्या अनेक वर्षापासुन आकर्षक राख्या तयार करणा-या व्यापा-यांनी मोराच्या पिसापासुन वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक राख्या तयार केल्या असुन त्या राख्यांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पुर्वी लहान मुलांसाठी स्पंजचा वापर करून राख्या तयार केल्या जात. मात्र, त्या पध्दतीच्या राख्यांचे प्रमाण कमी झाले आहे. रेशीम धाग्याचे महत्व पुर्वी होते आणि पुढेही राहणार आहे. यामुळे रेशीमच्या राख्यांना आजही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. राख्यामध्ये वेगवेगळे प्रकार उपलब्ध असले तरी यावेळी पर्यावरणाचा आणि पाणी वाचविण्याचा संदेश देण्याचा राख्या तयार करण्यात आले आहे. शहरातील काही विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या असुन त्यांची विक्री संस्थांमार्फत केली जात आहे. यावर्षीचे खास आकर्षक म्हणुन लहान मुलांसाठी भिंतीवर चढणारा स्पायडरमॅन, मिकीमाउस, डोनाल्ड डक, स्टोन राखी, डिस्को लाईट, जु जु वंडरबॉय, टेडी बेअर, आदि राख्या लहान मुलांचे आकर्षण ठरल्या आहेत. यावेळी राखी तयार करण्यासाठी लागणा-या साहित्याच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत राखीच्या किमती २ टक्यांनी वाढल्या आहेत. दोन रूपयापासुन ते ५०० रूपये किंमतीच्या राख्या विक्रीला आहेत. दिवसें दिवस राख्यांचा बाजार वाढत असुन चिल्लर विक्रेते मोठ्या प्रमाणात दिसुन येतात. सॅटिन रिबीन वापरून तयार केलेल्या तुळशींचे मणी, रूद्राक्षाचा वापर केलेल्या राख्या २० रूपये डझनपासुन २०० रूपये डझनपर्यंत विक्री होत आहे.
BYTE :- रवींद्र आगलावे (राखी विक्रेता)
VO :- बच्चे कंपनीसाठी कार्टुन्सची छबी असलेल्या, अन खेळणे असलेल्या राख्या उपलब्ध झाल्या आहेत. बाहुबली सिनेमाच्या नावाच्या राख्यादेखील उपलब्ध आहेत. तर लहान मुलांमध्ये आकर्षण असलेल्या स्पिनरच्या राख्यादेखील यंदा आकर्षण ठरत आहेत. तसेच विविध ‘पोज’ मजला छोटा भीम, भीम अ‍ॅण्ड बाल गणेश, भीम अ‍ॅण्ड फ्रेण्ड्स, टॉम अ‍ॅण्ड जेरी, अ‍ॅग्री बर्ड, डोरेमॉन, मोटु-पतलू या कार्टुन्स असलेल्या राख्याही उपलब्ध आहेत. काही राख्यांमध्ये बटण दाबले की लाईट लागते. छोट्यांच्या राख्यांची किमत ३० ते ६० रूपयापर्यंत आहे.Body:VO:- Conclusion:
Last Updated : Aug 13, 2019, 9:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.