गोंदिया - कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन सर्वत्र अत्यंत साधेपणाने सादरा होत आहे. गोंदियातील जिल्हाधिकारी कार्यालयात देखील महाराष्ट्र राज्य स्थापना दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी जिल्ह्यात इतिहासात पहिल्यांदाच केवळ जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळत कमी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
हेही वाचा... विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करा, राज्यपालांचे निवडणुक आयोगाला पत्र
राज्य शासनाकडून यावर्षी महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र दिनानिमित्त केवळ जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीच ध्वजारोहण करण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात अन्य कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम करण्यात आले नाहित.