ETV Bharat / state

कत्तलीसाठी नेत असलेल्या २८५ जनावरांची सुटका, मध्यप्रदेश व महाराष्ट्र पोलिसांची कारवाई

मध्यप्रदेश व महाराष्ट्र पोलिसांनी कतल्लीसाठी नेत असलेल्या जनावरांची सुटका केली आहे. सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरीया जंगलात २८५ जनावरे बांधून ठेवली होती. सालेकसा पोलिसांनी १ ऑगस्टला दुपारी सव्वातीन वाजता पेट्रोलिंग करताना ही जनावरे जप्त केली.

Madhya Pradesh and Maharashtra police release 285 animals in gondia
कत्तलीसाठी नेत असलेल्या २८५ जनावरांची सुटका
author img

By

Published : Aug 3, 2020, 8:39 PM IST

गोंदिया - मध्यप्रदेश व महाराष्ट्र पोलिसांनी कतल्लीसाठी नेत असलेल्या जनावरांची सुटका केली आहे. सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरीया जंगलात २८५ जनावरे बांधून ठेवली होती. सालेकसा पोलिसांनी १ ऑगस्टला दुपारी सव्वातीन वाजता पेट्रोलिंग करताना ही जनावरे जप्त केली.

पिपरीयाच्या घिनाई तलावाजवळ तीन गोल तारांचे रिंगन करून त्यात चारा-पाण्याची सोय न करता जनावरांना बांधून ठेवल्याची माहिती सालेकसा पोलिसांना मिळाली. सालेकसा पोलिसांनी धाड घालून ७० बैल, २० वासरे व ९५ गायी असे एकूण २८५ जनावरे जप्त केली. एकूण १३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कत्तलखान्यात ही जनावारे घेऊन जाण्याचा त्यांचा हा प्रयत्न मध्यप्रदेश व महाराष्ट्र पोलिसांनी हाणून पाडला. या घटनेसंदर्भात प्राण्यांना निदर्यतेने वागवण्याचा कायदा कलम ११, १ ड, ५ अ,ब, अन्वये सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चौबे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.