ETV Bharat / state

गोंदियात अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल, हजारो क्विंटल धानाचे नुकसान - गोंदियात अवकाळी पावसाची हजेरी

सर्वच तालुक्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरील धान पूर्णपणे भिजले आहे. त्यामुळे, आता या धानाला अंकुर फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Loss of grain in gondia
हजारो क्विंटल धानाचे नुकसान
author img

By

Published : Jun 2, 2020, 4:44 PM IST

गोंदिया - जिल्ह्यात सोमवारपासून वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. आजदेखील सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. अशात गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाने खरीप हंगामात खरेदी केलेला धान गोदामाअभावी उघड्यावर ठेवला गेला आहे. अवकाळी पावसामुळे या धानाचे नुकसान झाले आहे.

या धानाला आज आलेल्या वादळी पावसाचा फटका बसला आहे. हजारो क्विंटल धान या पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आधी कोरोना आणि आता मान्सूनपूर्व आलेल्या या पावसाने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. सोमवारी दिवसभर कडाक्याचे ऊन तापत असताना सायंकाळी साडेसहानंतर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज सकाळपासून जिल्ह्यातील सर्वच भागात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे.

सर्वच तालुक्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरील धान पुर्णपणे भिजले आहे. त्यामुळे, आता या धानाला अंकुर फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. अचानक आलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.