ETV Bharat / state

गेंडुरझरिया परिसरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त, नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला - गोंदिया लेटेस्ट न्यूज

जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भाग असलेल्या सालेकसा तालुक्यातील गेंडुरझरिया परिसरातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. घातपात करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी हे स्फोटकं या परिसरात लपवून ठेवले होते.

Large stockpile of explosives seized Gondia
गेंडुरझरिया परिसरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त
author img

By

Published : Dec 26, 2020, 10:27 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भाग असलेल्या सालेकसा तालुक्यातील गेंडुरझरिया परिसरातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. घातपात करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी हे स्फोटकं या परिसरात लपवून ठेवले होते.

गेंडुरझरिया परिसरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त

गेंडुरझरिया परिसरात नक्षलवाद्यांनी स्फोटकांचा साठा लपवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या भागात शोधमोहीम राबवली. या शोधमोहिमेमध्ये पोलिसांना गेंडुरझरीया पहाडावरील जंगलात एक 20 किलोग्राम वजनाचा डबा, 150 जिलेटीनच्या कांड्या, व 27 डिटोनेटर आढळून आले आहेत. पोलिसांनी हा स्फोटकांचा साठा ताब्यात घेतला असून, नक्षलवाद्यांनी घातपाताच्या उद्देशाने हा स्फोटकांचा साठा या ठिकाणी लपवून ठेवल्याची माहिती पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी पत्रपरिषदेत दिली. या प्रकरणी अज्ञात दहशतवाद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.