गोंदिया - येथील गोरेगाव तालुक्यात एकमेव राष्ट्रीयकृत बॅंक आॅफ महाराष्ट्र आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या बँकेतील आर्थिक व्यवहार आणि त्या बँकेतील कर्मचारी अधिकारी यांच्या निष्काळजी पणामुळे खातेदारांना त्याचा फटका बसू लागला आहे. अशातच एका विद्यार्थीनीच्या खात्यातील ४ हजार रुपये कोणी अज्ञात व्यक्तीने खोटी स्वाक्षरीकरुन काढले आहेत.
हेही वाचा- वाशीनाका येथे मोनोरेल पडली बंद; प्रवासी अडकले
पैसे काढलेल्या विड्रॉल अर्जावर २०२० वर्ष लिहले आहे. त्यामुळे वर्ष चुकीचे असताना पैसे दिलेच कसे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे गोरेगाव येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रात भोंगळ कारभार चालला असल्याचे दिसत आहे. १६ सप्टेंबरला गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथील आकांक्षा दिलराज सिंगाडे यांच्या बँक खात्यातून त्यांच्या सही विना ४ हजार रुपये काढवल्याचा प्रकरण समोर आला आहे.
हेही वाचा- या आठवड्यात तीन दिवसच बँक चालू राहणार; २६ व २७ सप्टेंबरला बँक कर्मचाऱ्यांचा संप
पैसे काढल्यावर खातेदाराच्या मोबाईलमध्ये मॅसेज आल्यावर खातेदार विद्यार्थीनी आणि तीचे वडील बॅंकेत गेले. मात्र बॅंकेकडून तुम्हीच पैसे काढले असल्याचे सांगण्यात आहे. याबाबत अधिक माहिसाठी बॅंकेतील सीसीटीव्ही तपासा असे खातेदाराकडून सांगण्यात आले. परंतु बॅंकेचे सीसीटीव्ही बंद असल्याचे उघड झाले. शेवटी खातेदारांनी याची तक्रार गोरेगाव पोलीस ठाण्यात केली आहे. मात्र अद्याप पोलिसांकडून किंवा बॅंकेकडून याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.