गोंदिया - कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, हा प्रकार घटनाबाह्य असल्याचे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. परंतु, या प्रकरणात कोणतीही पूर्व परवानगी न घेता केंद्राने हा तपास नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे दिला आहे. गृहमंत्री म्हणून याचा विरोध करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे दुर्दैवी असल्याचे देशमुख म्हणाले.