गोंदिया - जिल्ह्याच्या अतिदुर्गम अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या देवरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ककोडी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे हजारो आदिवासी बांधवाना रुग्णालयाचा फायदा होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबईतर्फे तयार करण्यात आलेल्या आधुनिक आणि विशिष्ट प्रकारच्या शालेय दफ्तरांचे वितरण करण्यात आले. देवरी, सालेकसा आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील २ हजार ३०० मुलांना याचा लाभ मिळाला. तसेच १० वर्षांपूर्वी देवरी तालुक्याच्या मिसफिरी गावातील ग्रामपंचायतीला नक्षलवाद्यांनी जाळले होते. यात गावातील नागरिकांचे सर्व कागदपत्रे जळली होती. १० वर्षांपासून जन्म मृत्यू प्रमाण पत्राकरता धडपडत असलेल्या गावकऱ्यांना प्रमाण पत्र वितरित करण्यात आले.