ETV Bharat / state

गोंदियात माणूसकीचे दर्शन, आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाला पोलिसांनी पाठवले स्वगावी

author img

By

Published : Aug 13, 2020, 6:33 PM IST

लॉगडाऊनमुळे पिंकीच्या हाताला काम नव्हते, त्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. त्यानंतर मदतीसाठी तिने किशोरी पोलीस ठाणे गाठले. येथे तिने ठाणेदार दीपक जाधव यांना आपली आपबिती सांगितली. त्यानंतर ठाणेदार दीपक जाधव यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने पिंकीला अन्य धान्याचा पुरवठा केला.

पिंकी प्रेम शंकर
पिंकी प्रेम शंकर

गोंदिया- कर्तव्य दक्ष पोलिसांनाही दयेचा पाझर फुटतो याचा प्रत्यक्ष अनुभव अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नागरिकांना आला आहे. जरूघाटा येथे आर्थिक संकटात सापडलेल्या एका महिलेची किशोरी पोलिसांनी मदत केली आहे. पोलिसांनी महिलेला अन्नधान्य व अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा केला आहे व तिला तिच्या कुटुंबासह स्वगावी पाठविण्यास मदत केली आहे.

माहिती देताना ठाणेदार दीपक जाधव

उत्तर प्रदेशातील चपराई, सिकंदरपूर येथील पिंकी प्रेम शंकर (वय ३०) ही तिच्या वडिलांचे निधन झाल्याने २९ फेब्रुवारीला आपल्या माहेरी जरूघाटा येथे आपल्या कुटुंबासह आली होती. त्यावेळी ती गरोदर होती. याच काळात लॉकडाऊनही जाहीर झाला. त्यानंतर, २० मे ला तिची प्रसूती झाली व तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला. या आधीही तिला दोन मुली आहेत. मात्र, कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. लॉकडाऊनमुळे तिच्या हाताला काम नव्हते, त्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. त्यानंतर मदतीसाठी तिने किशोरी पोलीस ठाणे गाठले. येथे तिने ठाणेदार दीपक जाधव यांना आपली आपबिती सांगितली. त्यानंतर ठाणेदार दीपक जाधव यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने पिंकीला अन्य धान्याचा पुरवठा केला.

काही दिवसांनी पिंकीला आपल्या गावी जान्याची ओढ लागली. मात्र, परिस्थिती बेताची असल्याने गावाला जायचे कसे, असा गंभीर प्रश्न तिला सतावू लागला. तिने पुन्हा किशोरी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना मदत मागितली. ठाणेदार जाधव यांनी मोठ्या भावाप्रमाणे महिलेची मदत करायची म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेला तिच्या कुटुंबियांसह स्वगावी पाठविण्याची तयारी केली. त्यानुसार, महिलेला नागपूरहून ट्रेनने जाण्यासाठी १३ ऑगस्टचे तिकीट काढून दिले. तसेच नागपूरला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करून दिली. त्यानंतर आज माहेरहून सासरी जाण्यासाठी पिंकी हसत-हसत निघाली.

अडचणीत पोलिसांनी केलेल्या मदतीबद्दल पिंकीने समाधान व्यक्त केले आहे. यावेळी पोलीस रुपी भावाने राखीची भेट दिल्याचा सुखद अनुभव तिच्या अश्रूंमधून दिसत होता. पोलिसांच्या या कामगिरीला सर्व स्तरातून कौतुकाची थाप मिळत आहे. कोरोना काळात माणसा माणसांमध्ये सामाजिक अंतर ठेवा, मात्र माणूसकी पासून दूर जाऊ नका, असा संदेश या घटनेतून मिळाला आहे.

हेही वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.