ETV Bharat / state

सागवन तस्करी करणाऱ्या ५ आरोपींना अटक; सालेकसा वन विभागाची कारवाई - गोंदिया बातमी

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्याच्या नक्षलग्रस्त परिसरातील कुलरभट्टी गावजवळील घनदाट जंगल परिसरात सागवन तस्करांच्या टोळीने धुमाकूळ माजवला आहे. यामध्ये सुनील उईके, अजय उईके, अनिल उईके, अशोक नरोटी व जीतलाल उईके यांचा समावेश आहे.

सागवन तस्करी करणाऱ्या ५ आरोपींना अटक; सालेकसा वन विभागाची कारवाई

author img

By

Published : Apr 18, 2020, 7:29 PM IST

गोंदिया - देशासह राज्या-राज्यात, जिल्ह्यात, गावात सगळीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लॉगडाऊन-२ सुरू आहे. ज्यामुळे जे जिथे आहेत त्याच ठिकाणी राहा व बाहेर पडू नका, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. यामुळे सर्व शासकीय यंत्रणा व कर्मचारी त्यावर उपाययोजना म्हणून केवळ काही कर्मचारी कार्यालयात उपस्थित ठेवून पाळीपाळीने हजेरी लावत आहेत. याचाच फायदा काही अवैधरित्या काम करणारे घेत असून गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्याच्या नक्षलग्रस्त परिसरातील कुलरभट्टी गावजवळील घनदाट जंगल परिसरात सागवन तस्करांच्या टोळीने धुमाकूळ माजवला आहे.

१७ एप्रिलच्या सायंकाळी काही लोक जंगलातील उच्च प्रतीचे सागवन वृक्ष तोडून त्याची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली. त्याच माहितीच्या आधारावर वन वनविभागाने तत्काळ सापळा रचत सागवन तस्करी करत असलेल्या पाच तस्करांना रंगेहात पकडले. यामध्ये सुनील उईके, अजय उईके, अनिल उईके, अशोक नरोटी व जीतलाल उईके यांचा समावेश आहे.

आरोपींकडून जवळपास 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) ई अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. सदर गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.