ETV Bharat / state

मातृपितृ दिनानिमित्त : निरोगी जीवन व प्रदुषणमुक्तीचा संदेश देण्यासाठी गोंदिया -डोंगरगड सायलकल वारी

निरोगी जीवन व प्रदूषणमुक्त वातावरणाचा संदेश २५ ते ३० युवक-युवतींचा संकल्प प्रदुषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी गोंदियाकरांनी ‘एक दिन सायकल के नाम’ हा उपक्रम सन २०१७ पासून सुरू केला आहे. आता हाच संदेश छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातही पोहचावा या उद्देशाने माँ बम्लेश्वरी धाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथे मातृ-पितृ दिवसानिमित्त १४ फेब्रुवारीला गोंदियातून २५ ते ३० युवक-युवती प्रवास करणार आहेत.

Gondia-Dongargad Cycle rally
Gondia-Dongargad Cycle rally
author img

By

Published : Feb 13, 2021, 4:57 PM IST

Updated : Feb 13, 2021, 5:06 PM IST

गोंदिया - दिवसेंदिवस वातावरणात बदल घडून येत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगचे संकेत मिळत आहेत. यासाठी विविध प्रकारचे प्रदूषण कारणीभूत आहे. प्रदूषणावर नियंत्रण मिळवून उत्तम आरोग्य व निरोगी जीवन जगण्याचा संदेश देण्यासाठी गोंदियातील युवा वर्गाने आता कंबर कसली आहे. १४ फेब्रुवारी रोजी मातृ-पितृ दिनानिमित्त गोंदियातील २५ ते ३० युवक-युवती सायकलने गोंदिया ते डोंगरगड असा प्रवास करून प्रदूषणमुक्तीचा संदेश देणार आहेत.

निरोगी जीवन व प्रदूषणमुक्त वातावरणाचा संदेश २५ ते ३० युवक-युवतींचा संकल्प प्रदुषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी गोंदियाकरांनी ‘एक दिन सायकल के नाम’ हा उपक्रम सन २०१७ पासून सुरू केला आहे. प्रत्येक आठवड्याच्या रविवारी १० ते २० किलोमीटर सायकलने प्रवास करून प्रदुषणमुक्त जीवन व आरोग्याचा संदेश देण्यात येत आहे. आता हाच संदेश छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातही पोहचावा या उद्देशाने माँ बम्लेश्वरी धाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथे मातृ-पितृ दिवसानिमित्त १४ फेब्रुवारीला गोंदियातून २५ ते ३० युवक-युवती प्रवास करणार आहेत.

गोंदिया -डोंगरगड सायलकल वारी
सन २०१७ पासून जेसीआय गोंदिया राईस सिटी व आज फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक दिन सायकल के नाम’ हे उपक्रम गोंदिया शहरातून सुरू करण्यात आले. प्रत्येक रविवारी एक ते दीड तास सायकल चालवून शहरातील नागरिकांना निरोगी जीवन व प्रभूषणमुक्तीचा संदेश देण्यात येत आहे. याच अभियानातील दोन युवक अमन व शांती हे प्रभूषणमुक्त भारताचा संदेश घेऊन तब्बल हजारो किलोमीटरचा प्रवास करून वाघा बॉर्डर-जम्मू काश्मीरपर्यंत पोहचले. या अभियानाचे महत्व बघून अभियानाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.या अभियानाच्या माध्यमातून इंधन बचतीचा संदेश सुद्धा दिला जात आहे. प्रदूषणापासून दूर होण्यासाठी शेकडो युवकांनी सायकल प्रवास सुरु केला आहे. आता हाच संदेश लगतच्या राज्यातही पोहोचावा या उद्देशाने छत्तीसगड राज्यातील डोगरगड येथील मा बम्लेश्वरीचे दर्शन घेण्यासाठी १४ फेबुवारीला सायकल यात्रा पोहचणार आहे. यापूर्वी सायकल यात्रेचे स्वागत व सुरुवात गोंदियातील स्थानिक वृत्तपत्र विक्रेता हिरवी झंडी दाखवून करणार आहेत. यात्रेचे स्वागत आमगाव तालुका पत्रकार संघ व सालेकसा येथे पोलीस विभागाकडून करण्यात येणार आहे.

Last Updated : Feb 13, 2021, 5:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.