गोंदिया - जिल्ह्यातील आमगाव येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 'ईव्हीएम हटाव देश बचाव' अशा घोषणा देत, राष्ट्रपती व निवडणूक आयोगांच्या नावे निवेदन पत्र तहसीलदारांकडे सुपूर्त केले. EVM ऐवजी बॅलेट पेपेरवर निवडणूका घ्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
गोंदियात काँग्रेसचे EVM विरोधात तहसीलदारांकडे निवेदन पत्र
अमेरिका व जपान यासारखे विकसित देशात EVM मशीन तयार केली जाते. मात्र त्या ठिकाणी आज ही बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेतल्या जातात. जपान देशाला ही या EVM मशीनवर भरोसा नसल्यामुळे त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणूक प्रक्रिया चालत आहे. भारतातही निवडणुकांमध्ये जे काही चुकीचे आणि संशयास्पद निकाल लागले आहेत, ते पाहता इथेही बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जाव्यात. ही आमची मागणी आहे, असे काँग्रेसचे माजी आमदार शेषराम कोरटे यांनी सांगितले आहे.
EVM विरोधात याच्या अगोदर सुद्धा अनेक पक्षांनी विरोध प्रदर्शन केले आहे. निवडणूक आयोगाला सुद्धा निवेदन दिली आहेत. जनतेचा EVM मशीन वर भरोसा नाही, त्यामुळे बॅलट पेपरवर निवडणूक घ्यायला काय हरकत आहे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार शेषराम कोरेटे, तालुका अध्यक्ष नामदेव किरसान यांच्यासह इतरही पक्षांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थीती होती.