ETV Bharat / state

O + VE Bombay blood group : विदर्भात पहिला O+VE बॉम्बे रक्तगट! नागपूर ते गोंदिया दुचाकी प्रवास करत केले रक्तदान - First O + VE Bombay blood group in Vidarbha

गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच O+VE बॉंम्बे रक्तगटाचा रुग्ण आढळला आहे. (First O + VE Bombay blood group in Vidarbha) मात्र, या रक्त गटाच्या रुग्णाला रक्त लागत असल्याने चक रक्तदान करण्यासाठी थेट नांदेड जिल्ह्यातून तरुणाने दुचाकी वाहनाने गोंदिया गाठत त्या रुग्णाला रक्तदान केले आहे. तब्ब्ल २० ते ४० लक्ष लोकांमध्ये हे O+VE बॉम्बे रक्तगट एखाद्या व्यक्तीमध्ये आढळतो.

नागपूर ते गोंदिया दुचाकी प्रवास करत केले रक्तदान

author img

By

Published : Feb 4, 2022, 9:17 AM IST

Updated : Feb 4, 2022, 9:46 AM IST

गोंदिया - पूर्व विदर्भाच्या गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच O+VE बॉम्बे रक्तगटाचा रुग्ण आढळला आहे. मात्र, या रक्त गटाच्या रुग्णाला रक्त लागत असल्याने चक रक्तदान करण्यासाठी थेट नांदेड जिल्ह्यातून तरुणाने दुचाकी वाहनाने गोंदिया गाठत त्या रुग्णाला रक्तदान केले आहे. तब्ब्ल २० ते ४० लक्ष लोकांमध्ये हे O+VE बॉम्बे रक्तगट एखाद्या व्यक्तीमध्ये आढळतो. संपूर्ण भारत देशात या रक्तगटाचे २२० लोक सध्या आहेत. (donated blood while traveling from Nagpur to Gondia) तर, एकट्या महाराष्ट्रात ५० च्या वर या O +VE बॉंम्बे रक्त गटाच्या लोकांचा समावेश आहे. १९५२ साली मुबई येथील डॉ. वाय. एम. भेंडे यांनी या रक्त गटाचे शोध लावले होते. हे नक्की काय आहे याबाबत ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.

व्हिडिओ

हा रक्त गट अंत्यत दुर्लब आहे

गोंदिया येथे एका खाजगी रुग्णालयात विनोद रामटेककर विनोद यांना मूत्र पिंडाचा आजार असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना रक्ताची गरज भासल्याने त्यांच्या रक्ताचे नमुने गोंदियातील लोकमान्य टिळक प्रयोग शाळेत पाठविले असता त्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. (First O + VE Bombay blood group) ती म्हणजे विनोद यांचे रक्त गट हे O +VE बॉम्बे रक्त गट आहे. हा रक्त गट अंत्यत दुर्लब असल्याने लोकमान्य टिळक रक्तपेढीने मुंबई येथील मैत्री फाउंडेशनच्या मदतीने O +VE बॉम्बे रक्त गट असलेल्या व्यक्तीचा शोध घेतला असता तो व्यक्ती नांदेड जिल्यातील असून त्याचे नाव माधव सुवर्णकार (वय, 36) असे आहे.

विनोद रामटेककर या व्यक्तीला रक्तदान करून त्यांचे प्राण वाचवले

माधव यांच्याशी संपर्क केला असता माधव यांनी नांदेड ते नागपूर एका खाजगी बसने प्रवास करीत नागपूर गाठले. मात्र, नागपूर ते गोंदिया दरम्यान पुढील प्रवासासाठी वेळेवर ट्रेन किंवा बस न मिळाल्याने माधव यांनी आपल्या मित्राची साथ घेत नागपूर ते गोंदियाचा प्रवास दुचाकी वाहनाने करीत गोंदिया गाठत गोंदियातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या विनोद रामटेककर या व्यक्तीला रक्तदान करून त्यांचे प्राण वाचविले आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा - पुण्यातील भिडे पुल पडणार! मुळा-मुठा नदीच्या सुशोभीकरणाच्या प्रकल्पाला मंजुरी

Last Updated : Feb 4, 2022, 9:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.