गोंदिया - शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या दुल्हेराजा कापड दुकानाला आग लागली. दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कापड गोदामात झालेल्या शॉटसर्किटमुळे ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच नगर परिषद अग्नी शामक विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनंतर त्यांनी आग आटोक्यात आणली.
दिवाळी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे गोंदिया शहरातील बाजार पेठात लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. बाजार पेठच्या मध्यभागी असलेल्या दुकानात आग लागल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्काळ आग लागलेला परिसर रिकामा केला. त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र, दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अग्नीशामक विभागाच्या गाड्या वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने आग लवकर आटोक्यात आली. अन्यथा बाजार परिसरातील इतर दुकानांना आगीने आपल्या कवेत घेतले असते.