गोंदिया- शहरातील मध्य भागातील बाजारपेठेत असलेल्या दुला हाऊस या कापड दुकानातील गोडाऊनला अचानक भीषण आग लागली आहे. या आगीत लाखो रुपयांचे कापड जळून खाक झाले आहे. ही घटना आज दुपारी ३ वजेच्या सुमारास घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समजले आहे.
दरम्यान, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हेही वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी