ETV Bharat / state

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, आठ महिन्यांपासून झाला नाही पगार - gondiya

अग्निशमन विभागात कार्यरत कंत्राटी अग्निशमन कर्मचाऱ्यांना कंत्राटदाराकडून मागील आठ महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
author img

By

Published : Jul 12, 2019, 11:48 AM IST

गोंदिया- अग्निशमन विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंत्राटदाराकडून मागील आठ महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. परिणामी या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी, नगर अध्यक्ष व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

अग्निशमन विभागात एका एजन्सीमार्फत कंत्राटी तत्वावर कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील आठ महिन्यांपासून कंत्राटदाराने पगार दिलेला नाही. परिणामी कंत्राटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे कर्मचारी कंत्राटदाराला पगार मागत असल्यास तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. नगर परिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांना याबाबत माहिती असूनही ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. परिणामी अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.

या संदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील यांना विचारले असता, त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. नगर परिषदेकडून कंत्राटदाराला पैसे दिले गेले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार रखडले असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कर्मचाऱ्यांच्या कामबंदमुळे हानी होण्याची शक्यता आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 11-07-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_11.JULY.19_FIREBRIGADE WORK STOP MOVEMENT
कंत्राटी अग्निशमन कर्मचा-यांचे कामबंद आंदोलन
आठ महिन्यांपासुन पगार नाही उपास मारीची वेळ
Anchor :- अग्निशमन विभागात कार्यरत कंत्राटी अग्निशमन कर्मचा-यांना कंत्राटदाराकडुन मागील आठ महिन्यांपासुन पगार देण्यात आलेला नाही. परिणामी या कर्मचा-यांवर उपासमारीची पाळी आली आहे. अशात त्यांनी येत्या आज आज गुरवार पासुन कामबंद आंदोलन पुकारले आहे. यासंदर्भात मुख्यधकारी नगर परिषद, नगर अध्यक्ष व जिल्हाधिका-यांना निवेदन दिले आहे. मात्र याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने आज काम बंद आंदोलन सुरु केले आहे. मात्र कुठे अचानक आग लागण्याचाही घटना घडल्यावर त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभाग कडे मनुष्य बाळ कमी असल्याने त्या घटने मुळे मोठी हानी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
VO :- येथील अग्निशमन विभागात एका एजंसीमार्फत कंत्राटी तत्वावर कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचा-यांना मागील आठ महिन्यांपासुन कंत्राटदाराने पगार दिलेला नाही. परिणामी या कंत्राटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची पाळी आली आहे. हे कर्मचारी कंत्राटदाराला पगार मागत असल्यास तो उडवाउडवीची उत्तरे देतो. पगारासाठी नगर परिषद पदाधिकारी व अधिका-यांनाही याबाबत माहिती असुनही कंत्राटदारावर काहीच कारवाई केली जात नसुन कर्मचा-यांचे पगारही काढले जात नाही. परिणामी पगाराअभावी अडचणीत असलेल्या या कर्मचा-यांनी आज गुरूवारपासुन कामबंद आंदोलन पुकारले आहे. या संदर्भात त्यांनी नगर परिषद चे मुख्याधिकारी चंदन पाटील यांना विचारांनी केली असता ते कॅमऱ्या समोर बोलण्यास नकार दिला व नगर परिषद मध्ये पैसे नसल्यामुळे कंत्राट दाराला पैसे नाही दिले आहे त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडले असल्याचे बोले आहे.
BYTE :- सचिन बहेकार (कर्मचारी)
BYTE :- अतुल मार्चटीवर (कर्मचारी)
BYTE :- लोकचंद भांडारकर (अग्नीशमन अधिकारी, गोंदिया)Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.