ETV Bharat / state

पारंपरिक धान शेतीला फाटा; गोंदियात शेतकऱ्याने फुलवली संत्र्याची बाग - गोंदियात फुलली संत्र्याची बाग

धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, पारंपारिक धानाच्या शेतीला फाटा देत नगदी पिके घेण्याकडे शेतकरी वळला आहे. जिल्ह्यातील सडक तालुक्यात येत असलेल्या सौंदड येथील शेतकरी जैपाल मारवाडे यांच्या वडिलांनी 43 वर्षांपूर्वी पहिल्यांदा संत्र्याची शेती सुरू केली

gondia
पारंपारिक धान शेतीला फाटा देत गोंदियात फुलली संत्र्याची बाग
author img

By

Published : Feb 26, 2020, 2:47 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील जैपाल मारवाडे या शेतकऱ्याने पश्चिम विदर्भातील संत्र्याच्या शेतीची मक्तेदारी मोडीत काढत यशस्वी संत्र्याच्या शेतीचा प्रयोग केला आहे. जिल्ह्यातील सौंदड येथील या शेतकऱ्याने दोन एकरात संत्र्याची लागवड केली. जिल्ह्यातील संत्र्याची शेती करणारे ते एकमेव शेतकरी असून त्यांचे संपूर्ण कुटुंबच या शेती कामात त्यांना मदत करत आहे.

पारंपारिक धान शेतीला फाटा देत गोंदियात फुलली संत्र्याची बाग

हेही वाचा - वेतन थकल्याने रुग्णवाहिका चालकांचा बेमुदत संप; संपूर्ण जिल्ह्यातील सेवा विस्कळीत

धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, पारंपरिक धानाच्या शेतीला फाटा देत नगदी पिके घेण्याकडे शेतकरी वळला आहे. जिल्ह्यातील सडक तालुक्यात येत असलेल्या सौंदड येथील शेतकरी जैपाल मारवाडे यांच्या वडिलांनी 43 वर्षांपूर्वी पहिल्यांदा संत्र्याची शेती सुरू केली. या शेतकऱ्याने दोन एकरात 189 संत्री आणि 11 मोसंबीची झाडे लावली. यात संत्रीच्या एका झाडापासून 100 किलो संत्री निघतात. त्यामुळे त्यांना दोन एकर संत्री शेतीतून 5 लाखांचे उत्पन्न मिळत आहे.

हेही वाचा - महाविकास आघाडीवर टीका करताना खासदार सुनिल मेंढेंची घसरली जीभ

मारवाडे यांना शेतीत त्यांची पत्नी शीतल मारवाडे, भाऊ दिगंबर, विजय मारवाडे आणि संपूर्ण कुटुंबच मदत करतात. शेतीला हातभार लावल्याने संत्रा शेतीला मोठा फायदा मिळत असून आतापर्यंत या शेतकऱ्याने कोणत्याही प्रकारची शासकीय मदत घेतली नाही. जैपाल हे संत्र्याची शेती करणारा जिल्ह्यातील एकमेव शेतकरी असून त्याच्या संत्र्याची मागणी आता कोलकाता, राजस्थान, मध्यप्रदेशासह इतर राज्यातही होऊ लागली आहे. तेव्हा आता जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक धान शेतीला फाटा देवून संत्रा शेतीकडे वळणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.