ETV Bharat / state

जन्माच्या तीन तासात तीनदा बदलले बाळाचे रक्त, 'एक्सचेंज ट्रान्सफ्यूजन'चा जिल्ह्यातील पहिला प्रयोग - Exchange transfusion

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका महिलेची गोंदियातील खासगी रुग्णालयात प्रसूती करण्यात आली. यावेळी आईचे रक्तगट निगेटीव्ह असल्याने बाळाला कावीळ आणि अ‌ॅनिमिया झाला. मात्र, डॉक्टरांनी बाळाच्या जन्मानंतरच्या ३ तासांमध्ये तीनदा रक्त बदलाची प्रक्रिया करून त्याचा जीव वाचवला. या प्रक्रियेला 'एक्सचेंज ट्रान्सफ्यूजन' असे म्हणत असून जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

जन्माच्या तीन तासात तीनदा बदलले बाळाचे रक्त

author img

By

Published : Feb 14, 2020, 8:35 PM IST

गोंदिया - अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका महिलेची गोंदियातील खासगी रुग्णालयात प्रसूती करण्यात आली. यावेळी आईचे रक्तगट निगेटीव्ह असल्याने बाळाला कावीळ आणि अ‌ॅनिमिया झाला. मात्र, डॉक्टरांनी बाळाच्या जन्मानंतरच्या ३ तासांमध्ये तीनदा रक्त बदलाची प्रक्रिया करून त्याचा जीव वाचवला. या प्रक्रियेला 'एक्सचेंज ट्रान्सफ्यूजन' असे म्हणत असून जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

'एक्सचेंज ट्रान्सफ्यूजन'चा जिल्ह्यातील पहिला प्रयोग

जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागातील किशोरी गावातील अर्चना दिपक गजभिये यांना प्रसूतीसाठी गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसूती झाल्यानंतर बाळाच्या आईचे रक्तगट निगेटिव्ह असल्यामुळे बाळाला गर्भाशयातच कावीळ झाला होता. त्याच्या शरीरातील रक्ताचे प्रमाणही कमी असल्यामुळे कावीळ आजार वाढून त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्याचे रक्त बदलणे गरजेचे होते. यासाठी बाळाच्या जन्मानंतर अवघ्या ३ तासांच्या आत बाळाचे रक्त बदलण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे अवघ्या ३ तासांमध्ये बाळाचे रक्त तीन वेळा बदलाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून सुखरूप असल्याने त्याला शुक्रवारी रुग्णालयातून सुट्टीही देण्यात आली. हे प्रकरण अत्यंत शिताफीने डॉ. सुनील देशमुख यांनी हाताळले. हा प्रयोग गोंदिया जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे.

हेही वाचा - व्हॅलेंटाईन डेला ‘संजीवनी किट’ची भेट; गोंदियातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप

एकेकाळी गोंदियातील रुग्ण लहान-सहान कारणांसाठी नागपूर येथे पाठविण्यात येत होते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागायचा, शिवाय वेळही वाया जात होता. नागपूरला जाण्याकरीता साडेतीन ते चार तासाचा वेळ लागत असल्यामुळे प्रसंगी रुग्णाचा जीव जाण्याची भीतीही असायची. मात्र, आजघडीला शहरात उच्च आरोग्य सेवा मिळण्यास सुरुवात झाली आहे. उच्च शिक्षण घेऊन येथे डॉक्टर स्थिरावत आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत देखील रुग्णांना उपचार मिळू लागला असून कठीण आजारांवर ही उपचार, सुविधा मिळू लागल्या आहेत.

हेही वाचा - नियुक्तीचा कालावधी आणि मानधन वाढवा ! गोंदिया जिल्हा परिषदेसमोर स्वयंपाकी महिलांचे धरणे आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.