गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील ( Gondia Truck Accident ) आमगाव-कामठा रोडवरील कट्टीपार जवळील नवेगाव फाट्यावर समोर ( elder woman accident at Navegaon fork on Amgaon-Kamtha road ) एका अज्ञात ट्रकने धडक दिल्याने ( old age woman hit by truck on Amgaon Kamtha Road ) ६५ वर्षीय वृध्द महिला जागीच ठार झाली. मीराबाई घनश्याम हरिनखेडे असे महिलेचे नाव आहे.
पत्ता विचारण्यासाठी थांबली आणि झाला अपघात- कोमल होमेन्द्र हरीणखेडे (वय २१ वर्षे) ही आपली आजी मीराबाई हरिनखेडे सोबत आत्याच्या उमरी (मध्यप्रदेश) या गावावरून स्कुटीने खुर्सीपारटोला स्वगावी परतत होती. या दरम्यान ती आमगाव-कामठा मार्गावर नवेगाव फाट्याजवळ स्कुटी थांबवून आजी रस्ता विचारण्यासाठी उतरली. याचवेळी आमगाव कडून येणाऱ्या अज्ञात ट्रकने वृद्ध महिलेस धकड देऊन पसार झाला. या अपघातात मीराबाईचा जागीच मृत्यू झाला. लोकांनी पोलिसांना व अंबुलन्सला माहिती दिली असता मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पाठविण्यात आले. कोमल हरिनखेडे हिच्या तक्रारीवरून अपराध २४६/२०२२, कलम २७९,३०४(अ) भादवी सहकलम १३५ (अ)(ब) १७७,१८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद जाधव करीत आहे आहे.