गोंदिया - रावणावर प्रभु रामचंद्र यांनी विजय मिळविला याचे औचित्य साधून दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा अनेक काळापासून सुरू आहे. मात्र या वर्षी कोरोनाचा संसर्ग असल्याने अनेक सार्वजनिक उत्सवावर विरजन पडले आहे. त्याचप्रमाणे रावण दहन कार्यक्रमावरही याचा परिणाम झाला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रावण दहनचे कार्यक्रम रद्द करण्यात आले तर काही ठिकाणी मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरात दसरा उत्सव समितीच्या वतीने रावण दहन करून विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला. तर या वेळी कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता कार्यक्रमामध्ये कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय उपाय योजना करावे, या बाबतचे माहिती फलक या ठिकाणी लावण्यात आले होते. तसेच मोक्याच्या ठिकाणी कमी लोकांच्या उपस्थितीत रावणाचा दहन करण्यात आला. यावेळी फेसबुक आणि लोकल केबलसह इतर सोशल मीडियातून रावण दहनचे कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण लोकांपर्यंत करण्यात आले.
हेही वाचा - अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथे बिबट्याच्या हल्यात बोकड ठार
हेही वाचा - गोंदियात मंदिरे सुरू करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे ढोल बजाओ आंदोलनासह महाआरती