गोंदिया - रावणवाडी परिसरात असलेल्या हळदीच्या गोडाऊन जवळ सकाळी ११ च्या सुमारास पाण्याच्या शोधात आलेल्या एका चितळावर कुत्र्यांनी हल्ला केला. मात्र, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे या चितळाची कुत्र्यांची सुटका झाली. कुत्र्याच्या या हल्ल्याच चितळ गंभीर जखमी झाले. याबाबत गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली. यानंतर वन विभागाच्या पथकाने घटना स्थळी पोहचून जखमी चितळ प्राण्याला ताब्यात घेऊन पशुसंवर्धन रुग्नालयात उपचारा करता दाखल केले. उपचारानंतर त्याला जंगलात सोडण्यात आले.
गोंदिया तालुक्यातील रावणवाडी परिसरात काही अंतरावर जंगल परिसर असून जवळच नदी आहे. यामुळे वन्य प्राणी मोठ्या प्राणावर या परिसरात आहेत. उन्हाळ्याच्या काळात जंगल परिसरात पाण्याच्या शोधात फिरत असताना अनेकदा वन्य प्राणी गावकडे भटकत येतात. मात्र, याचाच फायदा घेत गावातील कुत्रे वन्य प्राण्यावर हल्ले करतात. उन्हाळा सुरू झाल्याने वन विभागाने या वन्य प्राण्यांसाठी जंगलात पाणवठे तयार करावेत, अशी मागणी वन्य प्रेमी करत आहेत.