गोंदिया - जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी हेटी गावातील शेतात हरणाणे एका पाडसाला जन्म दिला. मात्र, जन्म देताच हरिण जंगालाच्या दिशेने पळून गेली. शेतात काम करणाऱ्या काही कामगारांना हे पाडस दिसताच त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. त्या पाडसाला वनविभागाने ताब्यात घेतले असून, त्याच्यावर प्रथमोपचार सुरू आहेत.
सकाळच्या सुमारास मुनेश्वर गहाणे यांच्या शेतात हे पाडस आढळून आले. गहाणे यांना तत्काळ शेतात काम करणाऱ्या कामगारांनी माहिती दिली. गहाने यांनी त्वरीत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन पाडसाला त्यांच्या ताब्यात दिले. शेतातील मजुरांची खळबळ ऐकून त्या पाडसाची आई निघून गेली असावी. जर हे पाडस कुत्रे किंवा इतर कोणत्याही जनावरांना आढळले असते तर त्याला स्वत:चा जीव गमवावा लागला असता. मात्र, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे या पाडसाला जीवदान मिळाले आहे. पाडसावर प्रथमोपचार करून जंगलात सोडून दिले जाणार आहे.