गोंदिया - महिला व बाळांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून महिला व बालविकास विभागाद्वारे सकस पोषण आहार देण्याची योजना अवलंबली गेली आहे. पण हीच योजना लहान बालकांच्या जीवावर उठली असल्याचा धक्कदायक प्रकार जिल्ह्याच्या बिजेपार येथे उघडकीस आला आहे. पोषण आहाराच्या मसूर डाळीच्या पाकिटात चक्क मृत वटवाघुळाचे पिल्लू आढळून आले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सीलबंद पाकिटात मृत वटवाघुळाचे पिल्लू आढल्याने हा पोषण आहार की शोषण आहार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या बिजेपार येथील सचिन मधुकर वाघमारे यांच्या मायरा वाघमारे या मुलीला अंगणवाडीतून मसूर डाळीचे पाकीट 8 दिवसांपूर्वी देण्यात आले होते. त्यांना उपयोगात आणत आज मसूर डाळीचे पाकीट उघडले असता, चक्क मृत वटवाघुळाचे पिल्लू आढळले. याची माहिती आंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आली असून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली गेली आहे.